शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालय खाली करा

By admin | Updated: August 6, 2015 23:46 IST

राजघराण्याचा आदेश : नवीन करार करण्यास नकार

सावंतवाडी : सावंतवाडीतील नव्या तहसीलदार इमारतीचे काम निधी अभावी बंद पडले असून भाड्याच्या इमारतीत तहसीलदार कार्यालय हलविण्यात आले आहे. त्या इमारतीतूनही तहसीलदार कार्यालय खाली करा, असे पत्र राजघराण्याने तहसीलदार कार्यालयाला पंधरा दिवसांपूर्वी पाठवले आहे. त्यामुळे नवी जागा कोठे शोधायची या विवंचनेत येथील तहसीलदार विभाग सापडला आहे. आणखी काही दिवस करार वाढवा, अशी मागणी राजघराण्याकडे करणार असल्याचे नायब तहसीलदार शशीकांत जाधव यांनी सांगितले. काम सहा महिने थांब याचा प्रत्यय वेळोवेळी सामान्य माणसाला येत असतो. मात्र, इमारत सरकारला भाड्याने द्यायची आणि भाड्याची वाट बघत सहा सहा महिने थांबायची, अशीच वेळ येथील इमारत मालकावर येत आहे. तीन वर्षापूर्वी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जुनी इमारत खाली करा व त्या जागेत नवीन इमारत बांधण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यासाठी २ कोटीचा निधीही प्राप्त झाला होता. तसेच तीन वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.त्यानुसार तीन वर्षासाठी भाड्याने इमारत शोधून तेथे तहसीलदार कार्यालय हलवण्याबाबत विचार सुरू होता. यासाठी मध्यवर्र्ती जागा निवडावी, असे ठरवण्यात आले. त्यानंतर राजघराण्याला विनंती करून राजवाड्याची एक इमारत मोकळी असून त्या ठिकाणी भाड्याने जागा देण्यात यावी, असे सुचवण्यात आले. त्यानुसार राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी ही इमारत ३६ हजार रूपये महिना भाडा या अटीवर दिली. तसा ३ वर्षाचा करारही करण्यात आला होता. मात्र मध्यंतरी अनेक वेळा महिन्याच्या महिन्याला भाडे देणे सरकारला शक्य होत नव्हते. अनेक वेळा भाडे उशिराने दिले जात होते. इमारतीच्या वापराविषयी त्रुुटी होत्या. यामुळे राजघराण्याने यावर्षी संपत असलेला करार पुन्हा पुढे न वाढण्याचा विचार चालवला असून तसे पत्रही सतीष कदम यांना पाठविले आहे.दरम्यान, तहसीलदार सतीष कदम हे आजारी असल्याने ते सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे नायब तहसीलदार शशीकांत जाधव यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला राजघराण्याकडून पंधरा दिवसांपूर्वीच पत्र आले आहे. त्यांनी तहसीलदार कार्यालय खाली करा असे सांगितले आहे.मात्र, करार वाढवा, असे सांगणार असल्याचे ते म्हणाले. चार दिवसात करार संपणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच बांधकाम विभागाने जागेची पाहणी केली असून जागेचे भाडे ३६ हजार वरून ४० करण्यात यावे, असे सुचविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)इमारतीला निधी नसल्याने बांधकाम रखडलेसावंतवाडी तहसीलदार कार्यालयाची भव्य दिव्य इमारत बांधायची या हेतूने तहसीलदार कार्यालय तीन वर्षापूर्वी खाली केले. मात्र, अद्यापही इमारत बांधण्यात आली नसून ही इमारत तीन वर्षात पूर्ण करण्याची मुदत होती. यासाठी २ कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला होता. पण सध्या या इमारतीचा पाया बांधून पूर्ण झाला असून निधी अभावी पुढचे काम सुरू नसल्याचे तहसीलदार विभागाने स्पष्ट केले आहे.