लोकसभेच्या अध्यक्षा महाजन आज चिपळुणात

By Admin | Updated: January 9, 2015 00:13 IST2015-01-08T23:45:38+5:302015-01-09T00:13:31+5:30

रत्नागिरीत प्रकट मुलाखत

Lok Sabha Speaker Mahajan today in Chiplun | लोकसभेच्या अध्यक्षा महाजन आज चिपळुणात

लोकसभेच्या अध्यक्षा महाजन आज चिपळुणात

रत्नागिरी : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उद्या, शुक्रवारपासून १२ जानेवारीपर्यंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे माहेर चिपळूण येथे असल्याने आणि नव्या सरकारच्या स्थापनेनंतर त्या प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या ग्रंथनगरीच्या सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास तसेच सायंकाळी साडेपाच वाजता चिपळूण नगर परिषदेतर्फे आयोजित नागरिक अभिनंदन कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार आहेत.शनिवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजता चिपळूण येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलला भेट दिल्यानंतर साडेअकरा वाजता रत्नागिरी व गणपतीपुळे येथे त्या भेट देणार आहेत. रविवारी (दि. ११) शहरातील श्रीमान गंगाधर गोविंंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुरुकुल संस्थेचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्या पावसला भेट देऊन मुंबईला परतणार आहेत. पहिल्या रात्री चिपळूण, तर त्यानंतर दोन रात्री त्यांचा मुक्काम येथील शासकीय विश्रामगृहात आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत प्रकट मुलाखत
शनिवारी (दि. १०) त्या रत्नागिरीत येणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात सुधीर गाडगीळ त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

Web Title: Lok Sabha Speaker Mahajan today in Chiplun