शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

देवतळेतील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत

By admin | Updated: November 11, 2014 23:21 IST

विहिरीमध्ये लाकडी पिंजरा सोडून त्याला ग्रामस्थांच्या सहाय्याने वर काढण्यात आले.

रत्नागिरी : देवतळे परिसरातील पाली वळके शेडनजीक एका खोल विहिरीत पडल्याने बिबट्या मृत झाला आहे. त्याचे अंदाजे वय २ वर्षे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तो बिबट्या एखाद्या भक्ष्याच्या मागे लागलेला असताना विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेले काही दिवस या परिसरात त्याचे सातत्याने वास्तव्य आढळून येत होते.त्या विहिरीवर हिरवी जाळी होती. त्याचा अंदाज न आल्याने मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नजीकच्या पाली देवतळे माळ येथील पाली - वळके रस्त्यानजीकचे कृषी सहाय्यक रघुनाथ डवरी यांच्या घरानजीकच्या विहिरीमध्ये उग्र वास येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता बिबट्या असल्याचे आढळून आल्याने तत्काळ वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी डवरी यांच्या विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता ३५ ते ४० फूट खोल पाण्यावर कुजलेल्या अवस्थेत बिबट्या तरंगताना आढळून आला. विहिरीमध्ये लाकडी पिंजरा सोडून त्याला ग्रामस्थांच्या सहाय्याने वर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली असता तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृत असल्याचे आढळून आल्याने त्याचा मृत्यू पाण्यात पडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा बिबट्या रात्रीच्या वेळी एखाद्या भक्ष्याच्या मागे असताना तोल जाऊन विहिरीत पडला असण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी तो पाण्यात पडल्यावर वर येण्यासाठी त्याने विहिरीतील पाईप व फुटबॉलच्या दोरीचा आधार घेतला असावा. त्यामुळे तीही तुटून पडली होती. तसेच विहिरीच्या भिंतीवरही पायाचे ठसे आढळून आले. बिबट्या पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. परंतु या विहिरीपासून नागरी वस्ती पन्नास फुटावर असूनही इतक्या दिवसांनी ही घटना उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या परिसरात दोन आठवड्यात बिबट्या आढळण्याची ही दुसरी घटना आहे.बिबट्याला परिक्षेत्र वनाधिकारी स. म. गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल व्ही. वाय. गुरवळ, वनरक्षक उमेश आखाडे यांनी जाळून नष्ट केले. त्याला बाहेर काढण्यासाठी दिनेश चाळके, धनंजय चव्हाण, अमर कोलते, अजित साळवी, संतोष गराटे, बळवंत मोरे, अनंत सुवारे, राजू दळवी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)