Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:36 IST2025-08-21T15:35:56+5:302025-08-21T15:36:40+5:30
डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती

Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कसाल-कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटे रेल्वे मार्गावरून जाताना मालगाडीची बिबट्याला धडक बसली. ज्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला. जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅकजवळील झुडपांमध्ये लपला होता. रेल्वे सुरक्षा दल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे सुमारे ४:३० वाजता रेल्वे मार्गाने जात असलेल्या मालगाडीची बिबट्याला धडक बसली. ही घटना घडल्यावर मालगाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर सकाळी ६:३० वाजता बिबट्या जेरबंद करण्यात आला. त्याच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तत्काळ कुडाळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला.