कणकवलीत एलसीबीने एक किलो गांजा पकडला; दोघांना अटक

By सुधीर राणे | Published: October 27, 2023 12:59 PM2023-10-27T12:59:53+5:302023-10-27T13:00:15+5:30

कणकवली : अंमली पदार्थविक्री विरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत कणकवली शहरात ३८ ...

LCB seizes one kg of ganja in Kankavli; Both were arrested | कणकवलीत एलसीबीने एक किलो गांजा पकडला; दोघांना अटक

कणकवलीत एलसीबीने एक किलो गांजा पकडला; दोघांना अटक

कणकवली : अंमली पदार्थविक्री विरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत कणकवली शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने काल, गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेल अप्पर डेक समोर महामार्ग सर्व्हिस रस्त्यावर ही मोहीम फत्ते केली. 

अनधिकृतरित्या गांजा बाळगल्या प्रकरणी निलेश ज्ञानदेव साटम (४४, रा. जानवली, गावठणवाडी ) आणि चेतन रामू जाधव (२०, रा.कलमठ, कुंभारवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. गांजासह ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी, रोख १८० रुपये आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी संशयित आरोपींकडून जप्त केला आहे. 

ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद घाग, उपनिरीक्षक आर.बी. शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली. हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदविली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.

Web Title: LCB seizes one kg of ganja in Kankavli; Both were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.