सिंधुदुर्गात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 16:16 IST2021-02-03T15:54:04+5:302021-02-03T16:16:46+5:30
Ram Mandir Sindhudurg- अयोध्या येथील राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला सिंधुदुर्ग जिल्हयात बुधवारी प्रारंभ झाला . या पार्श्वभूमीवर कणकवली पटकीदेवी मंदिर येथून श्रीराम रथाचे प्रस्थान झाले. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या अभियानांतर्गत श्रीराम रथ जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात निधी संकलनासाठी जाणार आहे.

सिंधुदुर्गात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला प्रारंभ
कणकवली : अयोध्या येथील राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिरनिधी समर्पण अभियानाला सिंधुदुर्ग जिल्हयात बुधवारी प्रारंभ झाला . या पार्श्वभूमीवर कणकवली पटकीदेवी मंदिर येथून श्रीराम रथाचे प्रस्थान झाले. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या अभियानांतर्गत श्रीराम रथ जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात निधी संकलनासाठी जाणार आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातील हा रथ कणकवली शहरात बुधवारी दाखल झाला.
या अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,सभापती मनोज रावराणे,विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष नंदकुमार आरोलकर,संघाचे कार्यवाह सुदेश राणे,दत्तप्रसाद ठाकूर,रवींद्र तांबोळकर,सुनील सावंत,श्रीकृष्ण वायंगणकर,जितेंद्र चिकोडी याच्यासह भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे,नगरसेवक अभिजित मुसळे,संजय कामतेकर,शिशिर परूळेकर,शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका प्रतीक्षा सावंत,अशोक करंबेळकर, विठ्ठल देसाई, संदीप मेस्त्री,महेश सावंत,बबलू सावंत,समर्थ राणे,राजन परब,प्रकाश पारकर,किशोर राणे,बंडू गांगण,नितीन पाडावे, पप्पू पुजारे,सुजाता हळदिवे,शहराध्यक्ष प्राची कर्पे,संजय ठाकूर सरचिटणीस पंढरी वायगंणकर,हर्षदा वाळके,प्रकाश पारकर,भाई मोरजकर, आयनल सरपंच बापू फाटक,असलदे उपसरपंच संतोष परब,प्रकाश सावंत,राजू पेडणेकर आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पटकीदेवी मंदिर येथून बाजरपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौक एस.टी.स्टँड पर्यंत या रथासोबत अनेक नागरिक होते. अनेकांनी आपापल्या परीने मदत निधी देत या अभियानाला सहकार्य केले.