शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडात स्वच्छ भारत अभियान सुरू

By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST

शनिवारी सकाळी मंडणगड ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बाजारपेठ, एस. टी. स्टँड परिसर व बाणकोट रोड परिसर या ठिकाणी स्वच्छता

मंडणगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आहे. त्यानुसार मंडणगड तालुक्यात शहर स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी मंडणगड ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बाजारपेठ, एस. टी. स्टँड परिसर व बाणकोट रोड परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात तहसीलदार कविता जाधव, नायब तहसीलदार विकास गारुडकर, विचूर, येथील एस. टी. आगार व्यवस्थापक पवार, जितेंद्र साळवी, शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, सरपंच महेंद्र सापटे, उपसरपंच काजल लोखंडे, सदस्य सेजल गोवळे, गोरिवले, ग्रामपंचायत कर्मचारी मनोज मर्चंडे, रमेश दुर्गवले, चंद्रकांत तलार, ग्रामस्थ परशुराम भेकत यांच्यासह शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पसिसर स्वच्छ करण्याबरोबर परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी वारंवार कचरा फेकणाऱ्यांवर यापुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही देण्यात आले. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी, देश आपोआप स्वच्छ होईल, अशी प्रतिक्रिया तहसीलदार कविता जाधव यांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणे, देवस्थाने, शाळा, अंगणवाड्या, शासकीय व निमशासकीय कार्यालये, मैदाने, समाज मंदीर व त्यांचा परिसर, आठवडा बाजार हे अभियान प्राधान्याने राबवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सार्वजनिक ठिकाणे, देवस्थाने, शाळा, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये, आठवडा बाजार इत्यादी ठिकाणी हे अभियान प्राधान्याने राबविणार.स्वच्छतेला प्राधान्य देत मंडणगड शहर परिसरातील साफसफाई करण्यावर दिला जातोय भर.सार्वजनिक स्वच्छतेतून संदेश.