शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

लेडी सिंघमकडून कारवाईसाठी आराखडा तयार

By admin | Updated: August 19, 2014 23:50 IST

अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी पथक

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा गाढ झोपी गेली असताना अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी वेंगुर्ले जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत दोन नंबरवाल्यांमध्ये अजूनही पोलिसांची जरब आहे हे दाखवून दिले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने टाकलेल्या या धाडीमुळे साहू यांची सर्व स्तरातून वाहवा होत आहे. जनतेच्या अपेक्षेला उतरत या लेडी सिंघमने आपला अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठीचा आराखडा बनवला असून वेगळे पथक तयार केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली सहा-सात वर्षे अवैध धंदे सुसाट सुरू आहेत. गोव्यातून दिवसाढवळ्या लाखो रूपयांची दारू सिंधुदुर्गात येत आहे. या दारूमुळे उत्पादन शुल्कचा महसूल बुडतो किंबहुना शासनाचे महिन्याला कोट्यवधीचे नुकसान होते. मात्र, याकडे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीला लक्ष देण्यास वेळ नाही. आणि येणारा अधिकारीही आपण दोन वर्षांनी जाणार, असे म्हणत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. उत्पादन शुल्क व पोलिसांचे अनेक नाके तर दारू पकडण्याऐवजी दारू वाहून नेण्याची साधने होऊन बसले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी गाढ झोपेत असताना वेंगुर्लेत सामान्य माणसाच्या मनातील कृती प्रत्यक्षात आणण्याचे काम लेडी आॅफिसरने करून दाखवले. वेंगुर्लेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. एवढ्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याचे काम सीमीत नव्हते तर तिने अवैध धंदेवाल्यांमध्ये पोलिसांची जरब दाखवून दिली आहे. ओरोस येथे पोलीस ठाण्याच्या लगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांपासून ते प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू आहे. या सर्वात वेंगुर्ले अव्वल मानला जात असे. सावंतवाडी लगत तर मळगाव, माजगाव, कोलगाव, सातार्डा, मळेवाड, कोंडुरा आदी ठिकाणाबरोबर कुडाळमधील माणगाव तसेच दोडामार्ग या ठिकाणी जुगाराचे फड रंगत असतात. वेंगुर्ल्यातील कारवाई नंतर आतातरी यामध्ये फरक पडेल, अशी आशा सामान्य माणसाला वाटत होती. पण आजही छुप्या पद्धतीने हे फड रंगतच आहेत. (प्रतिनिधी) गुन्हा अन्वेषणची पुनर्रचना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग हा स्ट्राँग विभाग मानला जातो. अप्पर पोलीस अधिक्षिका विनिता साहू लवकरच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास त्यांना सोपे जाणार आहे. ाी आताच जिल्ह्यात आलो असून, मी थोडा अभ्यास करेन. पण माझे एकच ध्येय आहे, अवैध धंद्यांचे उच्चाटन. त्यासाठी मी व माझे सहकारी दिवसरात्र काम करतील. कोणाला माहिती असेल, तर त्यांनी ती द्यावी. पण अवैध धंदे शिल्लक ठेवणार नाही. - संजय बावीस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग