शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कुणकी हत्तींचे पथक ७ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात

By admin | Updated: February 1, 2015 00:37 IST

संजय कदम : हत्ती पाठविण्यास कर्नाटक सरकारची परवानगी

कुडाळ : जिल्ह्यात धुडगूस घालणाऱ्या हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी कर्नाटकातून येणाऱ्या कुणकी हत्तीच्या पथकाला येण्यासाठी कर्नाटक सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. हे पथक ७ फेब्रुवारीला कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे पाच प्रशिक्षित हत्ती वैद्यकीय पथकासह दाखल होणार आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल संजय कदम यांनी दिली. जिल्ह्यात थैमान घालून अनेकांचे प्राण घेणाऱ्या, करोडोंच्या मालमत्तेची नुकसानी करणाऱ्या हत्तींना पकडून त्यांना योग्य ठिकाणी न्यावे, याकरिता खासदार विनायक राऊत यांनी राज्य तसेच केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे केंद्र शासनाने येथील हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कर्नाटकातील प्रशिक्षित हत्ती पाठविण्यासाठी मान्यता दिली होती. याला राज्य सरकारने मान्यता दिली, तरीही कर्नाटक सरकारची मान्यता मिळावी, याकरिता खासदार राऊत तसेच राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत होते. या प्रयत्नांना यश आले असून, कुणकी हत्तींच्या पथकाला जिल्ह्यात पाठविण्यासाठी मान्यता दिली आहे. डॉ. के. एस. उमाशंकर (वेटर्निटी डॉक्टर, राजीव गांधी नॅशनल पार्क, कर्नाटक) त्यांचे सहाय्यक म्हणून करूम भाई, दोड्डाप्पाजी हे वैद्यकीय पथकातील प्रमुख आहेत. पथकाला आवश्यक रक्कम आम्ही भरल्यामुळे हे पथक ७ फेब्रुवारी रोजी कर्नाटक येथून निघणार असून ते माणगाव आंब्रड येथे ९ फेब्रुवारी रोजी येईल, असेही कदम यांनी सांगितले. हत्ती माणगाव खोऱ्यात असल्यास काम सुरू केल्यापासून तीन दिवसांत पथक सर्व हत्तींना पकडणार आहे. येथील तीनही रानटी हत्ती माणगाव खोऱ्यात असल्यामुळे हे हत्ती पथकाला पकडणे सोपे जाणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली. (प्रतिनिधी) मान्यतेचे पत्र वनविभागाला कुणकी हत्ती तसेच प्रशिक्षित डॉक्टर व माहुतांचे पथक पाठविण्यात येणार असल्याच्या मान्यतेचे पत्र कर्नाटक शासनाने नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक व वन्यजीव विभागाला दिले असून ३० जानेवारीला कर्नाटकच्या मुख्य वनसंरक्षक व वन्यजीव विभागाने पाठविले. प्रवास खर्च भरला पथकाला प्रवास खर्च म्हणून ५० हजार ९६० रुपये संबंधित विभागाच्या बँक खाती जमा करा, असे या पत्रात नमूद केले होते. त्याप्रमाणे आम्ही शनिवारीच हे पैसे भरले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल संजय कदम यांनी दिली.