शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

कोल्हापूरच्या पिस्तूलचे कनेक्शन थेट कलमठ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:03 PM

Crimenews Kankavli Kolhapur- कोल्हापूर येथील एका युवकाकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेले पिस्तूल कलमठ येथील युवकाने दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .

ठळक मुद्दे कणकवली तालुुुक्यातील कलमठ येथील तरुण जाळ्यातमहामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या कामगारांना त्या युवकाकडून पुरवठा होत होता गांजा

कणकवली : कोल्हापूर येथील एका युवकाकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेले पिस्तूल कलमठ येथील युवकाने दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे .

कलमठमधील युवकाकडून यापूर्वी महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या कामगारांना गांजा पुरवठा करण्यात येत असल्याची ही चर्चा सुरू आहे . त्यामुळे त्या युवकाकडे आलेले पिस्तुल हे ठेकेदार कंपनीच्या कामगारांमार्फत मध्यप्रदेश कनेक्शन मधून आले का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे .कोल्हापूरपोलिसांनी कणकवलीत येत कलमठ मधील त्या वीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. सध्या तो युवक कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे . त्या युवकाचे कलमठ कणकवली भागात या पूर्वीचे काही कारनामे ही उघड झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे .

कलमठमधील त्या युवकाने कोल्हापूरमधील युवकाला पिस्तूल दिल्याचे पोलिसांकडे कबूल केल्याने कलमठमधील त्या युवकाने हे पिस्तूल आणले कुठून ? या हत्यार कनेक्शनचा नेमका संबंध काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे .

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्यार बाळगल्याप्रकरणी कोल्हापूर राधानगरी येथील सरवडेमधील एका युवकाला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले . त्याच्यावर कारवाई सुरू  आहे . सध्या तो तेथील पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत त्या आरोपीकडे तपास करत असताना त्याने बाळगलेले पिस्तूल कुठून आणले याच्या चौकशी दरम्यान या पिस्तुलचे कणकवली तालुक्यातील कलमठ कनेक्शन समोर आले . त्यानंतर कोल्हापूर पोलीस कणकवलीत दाखल झाले .त्यांनी आपल्यासोबत संशयित आरोपीला घेत कलमठमधील त्या युवकाचा शोध सुरू केला . कलमठ मधील तो युवक काही काळ कोल्हापूरमध्ये कामाला असल्याने आरोपी व युवकाची ओळख झाली होती . कणकवलीत या युवकाचा शोध घेत असताना पहिल्यांदा त्याच्या घराजवळ जाऊन चौकशी केली असता तो आपल्या आईसोबत कणकवलीत गेल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आपला मोर्चा कणकवली शहरात वळवला .

कणकवली शहरात तहसीलदार कार्यालयाच्या मागे तो तरुण निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले . त्याला कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आणत त्याची रवानगी कोल्हापूरला करण्यात आली . मात्र , अद्याप कलमठमधील त्या युवकावर गुन्हा दाखल झालेला नाही .

पण कणकवली शहरालगत असलेल्या भागात हत्यार कनेक्शन उघड झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . आता या प्रकरणात अजून कोणती नावे पुढे येतात ? याकडे लक्ष लागून राहिले आहे . तसेच ठेकेदार कंपनीच्या कामगारांचे यामागे काही कनेक्शन आहे का ? त्याचाही पोलिस तपास होण्याची गरज आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस