Join us  

T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी

West Indies get terror threat : जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 12:13 PM

Open in App

T20 World Cup 2024 : जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा सतरावा हंगाम संपताच लगेचच एक जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशातच या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट पसरले असून, पाकिस्तानातून दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याचे समजते. मात्र, क्रिकेट वेस्ट इंडिजने (CWI) सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.

पाकिस्तानच्या उत्तर प्रांतातून दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याचे कळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रो इस्लामिक स्टेटने (IS) विश्वचषकादरम्यान हल्ला करण्याची योजना आखली आहे. आयएस संघटनेच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडीओ संदेश जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये त्यांनी अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबद्दल भाष्य केले आहे. तसेच समर्थकांना त्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, जूनपासून वेस्ट इंडिजमधील अनेक शहरांमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. बार्बाडोस, गयाना, अँटिग्वा आणि बारबुडा, सेंट व्हिन्सेंट, सेंट लुसिया, ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो या ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकाचे सह-यजमान क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी दहशतवादी हल्ल्याच्या धमकीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही जिथे सामने होणार आहेत तेथील अधिकाऱ्यांशी जवळून काम करत आहोत आणि कोणत्याही धोक्यांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक धोरणांसह पुढे जाण्यासाठी काम करत आहोत.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 

अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तानवेस्ट इंडिजदहशतवादी हल्ला