शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरसाठी कोल्हापूर येतंय आणखी जवळ

By admin | Updated: January 30, 2015 23:12 IST

काजिर्डा परिषद : बी. जी. कोळसेपाटील यांच्याहस्ते लगतच्या रस्त्याचे भूमिपूजन

राजापूर : काजिर्डा गावच्या मुळावर आलेला धरण प्रकल्प रद्द करा, अशी जोरदार मागणी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या शेतकरी परिषदेत घुमल्यानंतर गावातून कोल्हापूरला लगतचा मार्ग ठरलेल्या रस्त्याचे भूमिपूजन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांच्या हस्ते पार पडले. अणुस्कूरा घाटापेक्षाही नजीकचा असा हा मार्ग असून, काजिर्डा घाटी पार केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याची हद्द सुरू होते. तेथून आठ किलोमीटर अंतरावर पडसाळी गाव येते. तेथून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर कोल्हापूर शहर येते. यापूर्वी शासनाने रस्त्याचे काम हाती घेतले होते. मात्र, नंतर अर्धवट सोडून देण्यात आले.गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ व पाटील म्हणून काम पाहणारे रामजी अप्पा पाटील हे १९७२ साली काजिर्डा गावचे सरपंच असताना तत्कालीन बांधकाम सभापती पु. ल. अण्णा वायकूळ यांच्या उपस्थितीत या घाटीरस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी लगतच्या कोळंब, मूर, काजिर्डा आदी गावातून माणसे मजूर म्हणून कामावर आली होती व त्या सर्वांना कामाचा मोबदला म्हणून गव्हाचे वाटप करण्यात आले होते, अशी माहिती स्वत: रामजी अप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतर कामाला सुरुवात देखील झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषविणारे तालुक्याचे सुपूत्र कै. भिकाजीराव चव्हाण हे आपल्या गाडीतून संपूर्ण घाट चढून गेले होते, अशीही माहिती रामजी पाटील यांनी दिली. तथापि गावात जामदा प्रकल्पाचे पडघम वाजू लागले व घाटमार्गे रस्त्याचा प्रश्न मागे पडला. तालुक्याच्या पूर्व परिसरातील जामदा खोरे विभागातील ग्रामस्थ यांना कोल्हापूरला जाण्यासाठी लगतचा हा मार्ग आहे. आजही भले चांगला रस्ता नसला तरी काजिर्डा व त्या परिसरातील नागरिक कोल्हापूरला जायचे असेल, तर काजिर्डा गावाची घाटी चढून वर जातात. त्यानंतर पडसाळीतून कोल्हापूरसाठीची बस पकडतात. तत्पूर्वी साधारणत: अर्धा ते पाऊण तास घाटी चढायला लागतो. शिवाय या नियोजित मार्गाला मोठी अवघड स्वरूपात वळणे नाहीत. उलट सरळ असा चढाव आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मात्र, गावात धरण प्रकल्पाचे काम सुरु झाल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या या रस्त्याच्या कामालादेखील पूर्णविराम मिळाला आहे. या मार्गामुळे आता राजापूर तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांना या मार्गामुळे सोय होणार ्आहे. यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)