शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे पाणी कोकणातच राहावे

By admin | Updated: January 4, 2015 01:01 IST

दीपक सावंत : कोकणच्या पाण्यावरून सेनेची कोपरखळी

सावंतवाडी : कोकणचे पाणी पळविण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र, ती आमची नैसर्गिक देणगी आहे. कोकणातील पाणी कोकणातच राहिले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्यात नेण्याची घोषणा केली होती. यावरून शिवसेनेने भाजपला कोकणच्या पाण्यावरून कोपरखळीच मारल्याची चर्चा सभागृहात होती.राज्याचे आरोग्यमंत्री शनिवारी सावंतवाडीतील आयोजित करण्यात आलेल्या काजू व कोको विकास निर्देशालय, भारत सरकार व कृषी पणन विभागाच्यावतीने आयोजित सेंद्रिय महोत्सव व काजू उत्पादन प्रशिक्षण वर्गात उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सेंद्रिय शेती धोरण मंत्रालय अध्यक्ष डॉ. शंकरराव राऊत, कृषी विभागाचे सहसंचालक एस. एल. जाधव, सभापती प्रमोद सावंत, सुचिता वजराठकर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, आर. जी. पाठक यावेळी उपस्थित होते.आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, कोकणात भरपूर काही होऊ शकते, पण आज राज्याच्या विचार करता सर्वच ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर उपाय होणे गरजेचे असून, राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.कोकणाला निसर्गाने बरेच काही दिले असून, कोकणला पाणी हे निसर्गाने दिले आहे. पण, ते आपण साठवून ठेवू शकत नाही. आता त्यावरही विचार होणे गरजेचे आहे. कोकणचे पाणी कोण तरी पळवण्याचा विचार करतात, त्यांना पाणी पळविण्यास देऊ नका. कोकणातील पाणी कोकणात राहायला द्या, असे आवाहन सावंत यांनी केले.मध्यंतरी भाजपचे नेते तथा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी कोकणचे पाणी मराठवाड्याला नेण्याची संकल्पना मांडली होती. त्यावर शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केलेली ही एकप्रकारची कोंडीच म्हणावी लागेल. कारण शिवसेना, भाजप हे राज्यात सत्तेत असून, कोकणच्या पाण्यावर मात्र वेगवेगळ्या भूमिका आहेत. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पेप्सी कंपनी सिंधुदुर्गमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असून योग्यप्रकारे त्यांना सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच शेतकरी माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श राहिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)