Sindhudurg: देवघरात गांजा लपवला, कणकवली पोलिसांनी केली एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:16 IST2025-07-02T14:15:10+5:302025-07-02T14:16:01+5:30
कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाच्या पथकाने जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी कणकवली ...

संग्रहित छाया
कणकवली : राहत्या घराच्या देवघरात लपवून ठेवलेला गांजा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाच्या पथकाने जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी कणकवली तालुक्यातील वारगाव ( रोडेवाडी) येथील प्रविण उर्फ बबन आत्माराम गुरव (वय-५५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
आरोपी प्रवीण गुरव याने आपल्या घरात अंमली पदार्थ गांजा साठा ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पथकाने संशयित प्रवीण उर्फ बबन गुरव याच्या घरावर काल, मंगळवारी रात्री छापा टाकला. तिथे तपासणी केली असता घरातील देवघरात बबन गुरव याने लपवून ठेवलेला १११ ग्रॅम वजनाचा ३ हजार २०० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. तो जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार आशिष जमादार यांनी कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली असून आरोपी प्रवीण उर्फ बबन गुरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, जॅक्सन घोंसालविस, आशिष जमादार, स्वाती सावंत यांच्या पथकाने केली.