शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तालुका हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST

स्वच्छ भारत अभियान : १ आॅक्टोबरला उत्सवी कार्यक्रम

कणकवली : तालुक्यातील ६३ ही ग्रामपंचायतींमधील गावांत कुटुंबागणिक शौचालयांची उपलब्धता झाल्याने कणकवली तालुका हागंदारीमुक्त झाला आहे. येत्या १ आॅक्टोबर रोजी त्यानिमित्त उत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, ग्रामविस्तार अधिकारी अरूण चव्हाण आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाअभावी उघड्यावर शौचाला जाणाऱ्या प्रत्येकासाठी शौचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ज्या तालुक्यांनी हे उद्दीष्ट प्राप्त केले आहे. त्यांना हागंदारीमुक्त तालुका घोषित केले जाते. कणकवली तालुक्यातील २०१२ च्या सर्वेक्षणावर आधारित ६३ ग्रामपंचायतींमधून ४३३५ शौचालये उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट होते. शेवटच्या टप्प्यात सात ग्रामपंचायतींमध्ये शौचालये उपलब्ध करून देण्याचे काम बाकी होते. ते आता पूर्ण झाले आहे. आता यासंदर्भातील आॅनलाईन माहिती भरण्याचे काम सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत ही माहिती अपडेट होईल. येत्या काळात शासनाच्या समितीकडून तालुक्यातील हागंदारीमुक्तीच्या कामाची पाहणी होईल. १ आॅक्टोबर रोजी हागंदारीमुक्तीच्या उत्सवी कार्यक्रमानिमित्त पंचायत समिती कार्यालयाकडून सकाळी ९ वाजता रॅलीचा प्रारंभ होईल. या रॅलीत विद्यार्थ्यांसह, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांसह ढोलपथक, पथनाटय आणि चित्ररथ असतील. पंचायत समितीपासून डीपी रोडवरून भगवती मंगल कार्यालयाकडे मुख्य कार्यक्रमस्थळी रॅलीचा समारोप होईल. भगवती मंगल कार्यालयातील कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यासह जिल्हा परिषदेतील विशेष समित्यांचे पदाधिकारी, खातेप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, खातेप्रमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हागंदारीमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार होणार आहे, असे आस्था सर्पे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सार्वजनिक शौचालयांसाठी प्रयत्नगावातील रहिवाशांव्यतिरीक्त गावात परगावातून तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या मजूरवर्ग आदींना शौचालयाची व्यवस्था नसल्यास ते उघड्यावर शौचास जातात. त्यांचाही विचार करण्यात येत सार्वजनिक शौचालयांसाठी प्रस्ताव मागवण्यात येतील.असे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी बोलताना सांगितले.