शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

तळवडे दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा

By admin | Updated: December 25, 2014 00:22 IST

राऊळ महाराजांची भेट : रांगोळी, चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

तळवडे : तळवडे येथील श्री देव दत्त मंदिर कलशारोहण सोहळा थाटात पार पडला. या कलशारोहण सोहळ्याला प. पू. अण्णा राऊळ महाराज यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या. तळवडे- खेरवाडी येथील श्री देव दत्त मंदिर हे जागृत देवस्थान असून परब कुटुंबीय या देवस्थानची देखभाल व सर्व धार्मिक विधी पार पाडतात. यावर्षी या पुरातन मंदिराचे नव्याने बांधकाम करण्यात आले. या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. या शिखर कलशारोहण सोहळ्याला हजारो भक्तांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. हा सोहळा चार दिवस सुरू होता. कलशारोहण सोहळ्यास राज्यमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार शंकर कांबळी, सावंतवाडी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. सोहळ्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकरिता रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी प्रोत्साहनपर उपक्रमांचे आयोजन तळवडे-खेरवाडी श्री दत्त मंदिर व्यवस्थापन कमिटी व मित्रमंडळाने केले होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तळवडे पंचक्रोशीत आकर्षक आणि भव्य असे दत्त मंदिर साकारण्यात आले आहे. याचा दत्तभक्तांना लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)