शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

किनळोस गावात कोळसुंद्यांची दहशत

By admin | Updated: September 17, 2014 22:26 IST

मेंढपाळांमध्ये भीती : पाच वर्षानंतर आगमन

कडावल : किनळोस गावात पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांंचे पुन्हा आगमन झाले आहे. प्रसंगी बिबट्या किंवा वाघालाही मारण्याची क्षमता असणाऱ्या या हिंस्त्र प्राण्याच्या अस्तित्वामुळे येथील मेंढपाळांच्या उरात धडकी भरली आहे. तर शेतकरी मात्र काहीसा रिलॅक्स झाला आहे. पाच वर्षांनंतरच का.... हा प्रश्न कित्येक पिढ्यांनंतर आजही अनुत्तरीत असून, या प्रकाराविषयी जनमानसात कुतूहल निर्माण झाले आहे. किनळोस ब्राम्हणस्थळ व देवाची गाळी परिसरात कोळसुंद्यांचा कळप गुराख्यांच्या दृष्टीस पडला. कळपात पूर्ण वाढ झालेले सुमारे बारा कोळसुंदे आहेत. विशेष म्हणजे, या परिसरात दर पाच वर्षांनी कोळसुंंदे प्रकट होतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे. कोळसुंद्यांच्या आगमनाने येथील मेंढपाळ वर्गाची पाचावर धारण बसली आहे. त्यांना भीतीच्या छायेखाली काम करावे लागणार आहे.येथील ब्राम्हणस्थळ भागात रानडुकरे, वनगाई, गवे व इतर रानटी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्याकडून शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होत आहे. कोळसुंद्यांच्या आगमनामुळे इतर प्राणी भीतीपोटी दूर जाणार असल्याने भातशेतीचे होणारे नुकसान टळणार आहे. एकंदरीत कोळसुंद्यांच्या आगमनाने मेंढपाळ वर्ग दहशतीखाली असला, तरी शेतकरी वर्ग मात्र काहीसा ‘रिलॅक्स’ झाला आहे. या प्राण्यांमुळे आतापर्यंत गावातील मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळसुंद्यांची शिकारही तितक्याच विशिष्ट पद्धतीने केली जाते. शिकारी लोक सावजाच्या डोळ्यात मूत्र शिंपडून त्याला प्रथम दृष्टीहीन करतात आणि मग त्याची शिकार के ली जाते. याविषयी प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराविषयी आश्चर्यही व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कोळसुंद्यांचा कळप दाखलपाच वर्षांनंतर किनळोस परिसरात कोळसुंद्यांचा कळप दाखल झाला आहे. या भागात दर पाच वर्षांनंतर कोळसुंद्यांचे अस्तित्व जाणवते. काही अपवाद वगळता, गेल्या कित्येक पिढ्यांपासून हा प्रकार सुरू आहे.