शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक भावनेमुळेच कबड्डीला पसंती

By admin | Updated: December 28, 2015 00:53 IST

सचिन खांबे : सत्काराच्या कार्यक्रमातून उलगडले बालपण; गुणीजनांचाही सत्कार

खेड : बालपणातच कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली़ तेव्हापासून आजपर्यंत मी कबड्डी खेळत आहे़ शिक्षण सुरू असतानाच तालुका आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमधून ख्ोळण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे या खेळातील अभिरूची आणखी वाढली. या खेळामध्ये हातापायाला इजा होईल या भीतीने माझ्या आई-वडिलांनी मात्र कबड्डी खेळण्यात विरोध केला होता. हा विरोध गांभीर्याने न घेता मोठ्या आत्मविश्वासाने कबड्डी खेळाचा सराव मी सुरूच ठेवला. यामुळे विविध जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली़ या खेळामध्ये आवश्यक असलेली अविश्रांत मेहनत आणि सकारात्मक भावना आजही कायम ठेवल्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याचा बहुमान मिळवता आला, असे राष्ट्रीय कबड्डीपटू सचिन खांबे याने सांगितले.खेड तालुक्यातील सुकिवली गावातील औदुंबर दत्त देवस्थानमध्ये आयोजित सन्मान वितरण सोहोळ्याप्रसंगी तो बोलत होता. कबड्डी खेळामध्ये आपण जाऊ नये, असा आई-वडिलांचा आग्रह होता. मात्र, त्यांची समजूत काढत आपण कबड्डी खेळामध्ये सर्वांच्या सहकार्याने उत्तम खेळ करत कबड्डी खेळावरील आपले प्रभुत्व आणखी मजबूत केल्याचे त्याने सांगितले़ यावेळी सचिन खांबे याचा दत्त देवस्थानचे संचालक श्रीकांत चाळके, आेंकार चाळके, महेश्वर चाळके, अक्षयकुमार चाळके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला़ दत्त देवस्थानच्यावतीने करण्यात आलेल्या सत्काराने आपण भारावून गेलो आहे. दत्तगुरूंच्या साक्षीने झालेला हा सत्कार आपल्या आयुष्यातील मोठी शिदोरी असल्याचे त्याने सांगितले. या सत्कारप्रसंगी मनोहर चाळके, भार्गव चाळके, गणेश चाळके, राजेंद्र चाळके, दत्ताराम चाळके, मनिषा चाळके, मंगेश चाळके, विलास दोरखडे, शारदा चाळके, प्रफुल्ल चाळके, श्रीकांत चव्हाण, दीपक चव्हाण, दीपक चाळके, सुभाष मोरे, सुरेश कदम, महेश चाळके, किशोर सावंत उपस्थित होते. यावेळी मुंबईतील पत्रकार एकनाथ बिरवटकर, तायक्वाँदोपटू सुनील शिंदे, प्रसिद्ध उद्योजक बशीर हजवानी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सिध्दी चाळके, सिध्दी दोरखडे, प्रविणा चाळके यांनाही सन्मानित करण्यात आले़ (प्रतिनिधी)सन २०१२ ते २०१५ दरम्यान बेंगलोर, भोपाळ, पटना येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये सचिन खांबे याने उत्तम खेळ केला़ २०१३मध्ये पटणा येथील स्पर्धेमध्ये त्याने महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती़ सलग ८ वर्ष त्याने राज्यातील विविध स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्हा संघाला प्रथम स्तरावर नेऊन ठेवले होते़ सन २०१३मधील प्रो - कबड्डी स्पर्धेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणूनही सन्मान मिळवला आहे़ मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्याची ‘पुणेरी फलटन’ संघामध्ये निवड झाली आहे.