शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

जयगड, संगमेश्वरची कोट्यवधीची पाणीपट्टी

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

तत्काळ अहवाल देण्याचे आदेश

रत्नागिरी : जयगड आणि संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची १ कोटी ९६ लाख रुपयांची पाणीपट्टी थकल्याबाबत जोरदार चर्चा झाली. या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तत्काळ माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या आज झालेल्या सभेत अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी दिला. ही सभा जिल्हा परिषद अध्यक्ष राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जयगड आणि संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीपट्टी वसूल करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पाणीपट्टी थकीत राहिल्याबाबतचा प्रश्न आजच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. त्यावेळी संगमेश्वर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७५ लाख रुपये आणि जयगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची १ कोटी २१ लाख रुपये अशी एकूण १ कोटी ९६ लाख रुपयांची पाणी पट्टी थकीत असल्याचे पुढे आले. ही पाणीपट्टी आजपर्यंत का वसूल करण्यात आली नाही, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. अध्यक्ष राजापकर यांनी थकीत पाणीपट्टीचा विषय गांभिर्याने घेतला आहे. रत्नागिरी व संगमेश्वर पंचायत समित्यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडून तत्काळ माहिती मागविण्याचा आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव, चिपळूण तालुक्यातील कादवड, तोंडली कळंबटेवाडी व रामपूर जोदगा या पाणी पुरवठा योजनांच्या रिवाईज इस्टीमेंटना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लवकरच या येथील हजारो लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अध्यक्ष राजापकर यांनी सांगितले. या सभेला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)