शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये जाखडी, भजनी मंडळांनी धरला नवा ताल

By admin | Updated: August 12, 2015 23:03 IST

गणेशोत्सवाचे वेध : शेकडो भजनी मंडळे संत परंपरा जपण्यात मग्न

श्रीकांत चाळके-खेड  -गणेशोत्सव आता महिन्यावर आला आहे. या सणाचे खास आकर्षण असलेल्या जाखडी नृत्य आणि भजन मंडळांनी आतापासूनच ताल धरला आहे. जाखडी कलाकारांनी आपल्या सरावाला आतापासूनच प्रारंभ केला आहे. दुसऱ्या बाजूला भजनी मंडळांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संत परंपरा जपण्यात आपले आजवरचे संगीतमय परिश्रम पणाला लावले आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने आता जाखडीनृत्याचे साऱ्यांनाच वेध लागले आहेत. येत्या १७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, मांगल्य आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या या सणाचे महत्त्व काही औरच असते. म्हणूनच कोकणातील जाखडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाखडीमध्ये बालकलाकारांसह मोठ्यांनाही नृत्य करण्याची संधी असते. मात्र, जुने झुगारून दिल्याने आधुनिकतेमध्ये समरस होण्याच्या दृष्टीने जाखडीमध्ये लहान कलाकारांनाच जास्त संधी दिली जाते. नृत्य करणारे ८ कलाकार, दोन ढोलकीपटूंसह झांजपथक आणि गायक असा १३ कलाकारांचा समूह म्हणजे जाखडीचा नवा आविष्कारच असतो.पारंपरिक जाखडीतील तोचपणा वगळून रसिकांना नव्याने आस्वाद घेता यावा, याकरिता जाखडीतील प्रत्येक कलाकार नवा आणि वैविध्यपूर्ण पोशाख परिधान करतो़ गौरी आणि गणपतींसमोर आपली कला सादर करणाऱ्या या जाखडी नृत्य मंडळाला ही अनोखी संधी मिळत असल्याने ही कला अधिकाधिक वृध्दिंगत झाली आहे़ या कलेच्या माध्यमातून जाखडी आणि भजनी मंडळांनी या लोककला सातासमुद्राबाहेर पोहोचविल्या. गेल्या काही वर्षांत जाखडी नृत्याच्या कॅसेटची गणेशोत्सवात विक्रमी विक्री केली जाते. त्यामुळे प्रतिवर्षी विविध ढंगातील, विविध चालीतील जाखडीच्या कॅसेटस् बाजारात येतात.खेड तालुक्यातील जाखडी आणि भजनी मंडळांनी आपल्या या लोककला संगीताच्या रूपाने स्वरबध्द केल्या आहेत. तालुक्यात शेकडो भजनी मंडळे सुरू आहेत. या सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्या लोककला जोपासत आहेत. बाप्पाच्या स्वागताकरिता ठिकठिकाणी कमानी उभारून गणेशभक्तांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाची प्रचिती आणून दिली आहे. तालुक्यातील नामांकित अनेक जाखडी मंडळांनी बालगोपाळांच्या सरावाकरिता आरंभ केला आहे. श्रीगणेशाचे जोरदार स्वागत करण्यासाठी प्रत्येक वर्षी नवा ताल आणि सुरांची गाणी रचण्यासाठी ही मंडळे आता जोरदार सराव करू लागली आहेत. कोकणातील सांस्कृतिक परंपरेचे हे स्थान जाखडी आणि भजनाच्या या कलांद्वारे समृध्द झाले आहे.तालुक्यातील संगीतप्रेमींनी आपल्या संगीत भजनाची व जाखडी नृत्याची सांगड घालण्यास प्रारंभ केला आहे. खेड तालुक्यातील १० भजन मंडळांनी तालुका आणि जिल्हास्तरावर आपली कला सादर केली. केवळ महिनाभराच्या अंतराने येत असलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या कला अधिकाधिक जोपासता येणार आहेत.जाखडी नृत्य नव्या रुपात, नव्या ढंगात.दरवर्षी गणेशोत्सवात जाखडी नृत्याच्या कॅसेटची होते विक्रमी उलाढाल.ग्रामीण भागात जाखडी नृत्याचा सराव सुरु.गणेशोत्सवाची चाहूल.