Sindhudurg-Local Body Election: अंदर की बात दीपक केसरकर हमारे साथ, मंत्री नितेश राणेंच्या नाऱ्याने सगळेच अवाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:35 IST2025-11-25T17:33:48+5:302025-11-25T17:35:47+5:30
'काही जण नेहमीच चांगल्या कामाला आडवे जात असतात त्यांना जनता चांगलीच आडवी करेल'

Sindhudurg-Local Body Election: अंदर की बात दीपक केसरकर हमारे साथ, मंत्री नितेश राणेंच्या नाऱ्याने सगळेच अवाक
सावंतवाडी : येथील राजघराण्याचे आध्यात्मिक क्षेत्रात जसे मोठे योगदान आहे. तसेच ते सावंतवाडीच्या वाटचालीत ही भरीव कार्य केले आहे. पण काही जण हे विसरत चालले आहे. मात्र, येथील जनता सुज्ञ आहे असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेसेनेचे नाव न घेता केला. तसेच आता आपणास विसर पडला असला तरी जनता नक्कीच आठवण करून देईल असेही म्हणाले. तर अंदर की बात दीपक केसरकर हमारे साथ म्हणत मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीत ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मत्स बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची येथील गांधी चौक येथे आज. मंगळवारी प्रचार सभा पार पडली. यावेळी अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल परब, बबन साळगावकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रध्दा सावंत भोंसले, श्वेता कोरगांवकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. कारण आमच्यासाठी राजघराणे हे श्रध्देचा विषय असतो पण काही जण कामापुरते विचार करतात. चांगल्या कामासाठी आर्शिवाद घ्याचे आणि नंतर मात्र सर्व विसरायचे हे योग्य नाही. माणसाला मागे कुणी काय केलं ? हे विसरायची सवय असते. पण आम्ही विसरणारे नाही तर सन्मान करणारे असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. काही जण नेहमीच चांगल्या कामाला आडवे जात असतात त्यांना येथील जनता चांगलीच आडवी करेल. त्यामुळे आता सर्वांनीच आपले हित कशात आहे ते ओळखावे असे आवाहन केले. तर श्रध्दा सावंत भोंसले यांनी ही आपण भविष्यात काय करणार याचा लेखाजोखा मांडला.
अंदर कि बात दीपक केसरकर हमारे साथ
मंत्री नितेश राणे यांनी संजू परब यांच्यावर टीकेचे बाण सोडले. तर दीपक केसरकर यांना चांगलेच गोजारले. चव्हाण यांनी बोलवल असत तर केसरकर व्यासपीठावर ही आले असते असे म्हणत 'ये अंदर कि बात है केसरकर हमारे साथ है' असा नारा दिल्याने सगळेच जण अवाक झाले.
