शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बारा मच्छिमारांची निर्दोष मुक्तता

By admin | Updated: September 28, 2015 23:33 IST

देवगड न्यायालयाचा निकाल : पर्ससीननेट नौकेवर हल्ला प्रकरण

देवगड : देवगड पवनचक्की समोरील खुल्या समुद्रात पर्ससीननेट यंत्रधारक मच्छिमारी नौकेवर भरदिवसा हल्ला चढवून तोडफोड केल्याच्या व खंडणी मागितल्याच्या आरोपातून देवगड आनंदवाडी येथील १२ पारंपरिक मच्छिमारांची देवगड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. देवगड पवनचक्कीवर सुमारे ७ वाव खोल समुद्रात दिनांक १८ एप्रिल २0१२ रोजी मालवण येथील प्रसिध्द पर्ससीननेट व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपीनाथ तांडेल यांच्या मालकीची ‘मखरेश्वर’ ही पर्ससीननेट मच्छिमारी नौका मासेमारी करताना पारंपरिक मच्छिमारांना आढळून आली होती. यावेळेस देवगड आनंदवाडी येथील १२ पारंपरीक मच्छिमारांनी ‘मखरेश्वर’ नौकेवर ८ ते १० पारंपरीक नौकांचा वापर करून हल्ला चढविला आणि बोटीतील खलाशांना जबरी मारहाण केल्याची तक्रार मखरेश्वर बोटीचे मालक गोपीनाथ तांडेल यांनी १८ एप्रिल २0१२ रोजी देवगड पोलीसात दिली होती. यावेळेस पारंपरीक मच्छिमारांनी बोटीतील सर्व खलाश्यांना भर समुद्रात मारहाण करून त्यांच्याकडून पन्नास हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप देखील तक्रारदार व खलाश्यांनी केला होता. तांडेल यांच्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी आनंदवाडी येथील प्रदीप कोयंडे, गंगाधर कुबल, काशिनाथ कुबल, कुंजन मुणगेकर, प्रकाश बांदकर, महेश जोशी, गणेश कुबल, धाकू कोयंडे, निशिकांत कुबल, लिलाधर कोयंडे, उमाजी प्रभू ज्ञानेश्वर मालवणकर या १२ पारंपारीक मच्छिमार व्यवसायिकांविरूध्द ३४ कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतला होता तर काही आरोपींना अटक देखील झाली होती.सदर खटल्याची सुनावणी देवगड न्यायालयात दिनांक ३ जुलै २०१३ रोजी पासून देवगडचे प्रथमवर्ग न्यादंघधिकारी न्यायाधिश कमलेश माने यांच्या न्यायालयात सुरू झाली होती. सुमारे दोन वर्ष चाललेल्या या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे स्वत: नौका मालक श्री. गोपीनाथ तांडेल आणि प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असणारे एकूण ८ खलाशी साक्षीदार म्हणून तपासण्यात आले होते मारहाण व खंडणीबाबत प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदारांनी उलट तपासा दरम्यान दिलेली विसंगत उत्तरे आणि खटल्यातील प्रत्यक्ष पुराव्यातील तफावत या बाबी संशयित आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद दरम्यान न्यायालयात पटवून दिले. उभय पक्षांची सुनावणी पूर्ण झाल्यावर देवगड न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी सर्व १२ संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी सर्व बाराही आरोपींच्या वतीने देवगड येथील अ‍ॅड.कौस्तुभ मराठे व अ‍ॅड. प्रकाश बोडस यांनी बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहिले होते. (प्रतिनिधी)