शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ

By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST

देवगडात रूग्णांची हेळसांड

देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉक्टर रूग्ण व नातेवाईकांना सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याने दिवसेंदिवस देवगड ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांच्या तक्रारीत वाढ होत आहे.सर्वसामान्य रूग्णांना खासगी दवाखान्यात जाणे परवडत नाही. त्यामुळे रूग्ण ग्रामीण रूग्णालयात जात असतात. देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉ. भिसे हे रूग्णांबरोबर उद्धट भाषा वापरून रूग्णांच्या आजारपणावर मात करण्याऐवजी रूग्णाचा आजार वाढवत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना योग्य उपचार न मिळाल्याने तसेच उपचारासाठी विलंब लावल्याने व हलगर्जीपणा केल्याने बालके प्रसुतीपूर्वीच दगावल्याचे प्रकारही घडले आहेत. ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्ण व नातेवाईकांनी तक्रारवहीमध्ये अनेक तक्रारी लिहिल्या आहेत. मात्र, या तक्रारीची वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने डॉ. भिसे यांचा मुजोरपणा वाढला आहे. आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच देवगड ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन डॉ. भिसे यांना रूग्णांना योग्य वागणूक व तपासणी करण्याचे सक्त आदेश दिले होते. तसेच काही लोकप्रतिनिधींनीही डॉ. भिसे यांना त्यांच्या कामगिरीच्या विरोधात घेरावही घातला होता. मात्र, या प्रकाराचा डॉ. भिसेंवर कोणताही परिणाम झालेला नसून त्यांची मुजोरी व रूग्णांना नाहक त्रास देण्याचे काम सुरूच आहे. डॉ. भिसे यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी देवगडवासीयांतर्फे केली जात आहे. रूग्णांचे प्राण वाचविणारे रूग्णालय आता डॉ. भिसे यांच्या अशा कृत्यामुळे मृत्यूचे द्वार बनले आहे. यामुळे ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णांना तपासणीसाठी जाण्याची डॉ. भिसे यांच्या अशा कृत्यामुळे भीती वाटत आहे. या समस्येचा गांभिर्याने विचार करावा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)