नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:15 IST2020-09-29T15:13:55+5:302020-09-29T15:15:21+5:30
कणकवली तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांना संदेश सावंत यांनी निवेदन दिले. यावेळी बुलंद पटेल,मिलींद मेस्त्री,संजय सावंत,संतोष आग्रे आदी उपस्थित होते.
कणकवली : तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गोर गरीब शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे.यामध्ये पिकांना कीड लागणे, ती काळी पडणे तसेच शेतीत पाणी साचून पीकांचे नुकसान होत असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.शेती पूर्ण होवून देखील हाता तोंडाशी आलेले पीक उद्धवस्त होताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी बुलंद पटेल,पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री,सरपंच संजय सावंत, संतोष आग्रे,राजू पेडणेकर, नितीन गावकर,प्रफुल्ल काणेकर,स्वप्नील चिंदरकर,हरकूळ उपसरपंच परब आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये शेतीला कीड लागणे,शेती काळी पडणे तसेच शेतीत पाणी साचून पीकांचे नुकसान होत असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.शेती पूर्ण होवून देखील हाता तोंडाशी आलेले पीक उद्धवस्त होताना दिसत आहे.
आपण या पूर्ण कणकवली तालुक्यातील शेतीची प्रत्यक्ष पहाणी करून स्थानिक पातळीवरच पंचनामे करून त्यानुसार त्यांची नुकसान भरपाई तत्काळ मिळेल.यासाठी प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर पाठपुरावा करावा.जेणे करून गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची किमान भरपाई तरी मिळेल. तसेच संबंधित शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.
यावर तहसिदार आर.जे.पवार म्हणाले ,तालुक्यातील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडून निधी आल्यास त्याचे वाटप लवकरात लवकर करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.