शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

'गृहरक्षक दलाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 30, 2015 23:11 IST

केंद्राचे धोरण : जातीय दंगे थोपविण्यासाठीच होता प्रयत्न

संजय सुर्वे - शिरगांव --१९४७ साली सुरु झालेल्या जातीय दंगली शमवण्यासाठी समाजातील सेवाभावी प्रतिष्ठितांनी सहभाग घेतला. तत्कालीन स्थितीत मोरारजी देसाई यांनी गृहरक्षक दलाची स्थापना केली. आजवर वसंतदादा पाटील, राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही या दलात अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. असा गौरवशाली इतिहास असणाऱ्या गृहरक्षक दलावर भाजप सरकारने वक्रदृष्टी फिरवली आहे. नव्या धोरणांमुळे यापुढे या दलात जवान येतील, अशी शक्यताच धूसर बनली आहे. पोलीस महासंचालक व पोलीस महासमादेशक यांच्या एकत्रित निर्णयानुसार राज्यातील ५६,००० जवानांची दर रविवारी होणारी परेड बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९०० जवान यापुढे केवळ पोलीस यंत्रणेला आवश्यक वाटल्यास बंदोबस्तात दिसणार आहेत. अधिकारी व जवान यांच्यात समन्वय रहावा, समाजसेवेचे काम करताना सुसंवाद, शारीरिक तंदुरुस्ती अशा बाजूने ही परेड महत्त्वपूर्ण मानली जात होती. या परेडला हजर राहणाऱ्या जवानास भत्ता म्हणून ९० रुपये अदा करण्यात येत होते. कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास मोलाची मदत करणारे पोलीसांसारखे प्रशिक्षण घेतलेल्या जवानांसाठी पोलीस, सेनादलात आरक्षणाची तरतूद यापूर्वीच्या शासनाने केली आहे. त्या ठिकाणीही या जवानांना सापत्नपणाची वागणूक दिल्याचे अनुभव अनेकांना आले असतानाच, संघटनेच्या मूळ संकल्पनेलाच धक्का देणाऱ्या शासन निर्णयाचा दलातून धिक्कार होत आहे. याबाबत जिल्हा गृहरक्षक दलाचे समादेशक महेश घोसाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण व्यक्तीश: शासनविरोधात जनहित याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी विविध मार्ग असू शकतात. निष्काम सेवेचे ब्रीद जोपाासत दलात कार्यरत असणाऱ्या जवानांचे यामुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. यापुढे गृहरक्षक दलात भरतीही होईल अशी शक्यता दिसत नाही. भाजप सरकारने मूळ संकल्पनेचा, जवानांच्या त्यागाचा विचार केला नाही हे अतिशय निंदनीय असल्याचे जिल्हा समादेशक महेश घोसाळकर यांनी सांगितले. मदतीची अपेक्षा सेवाभावी प्रतिष्ठितांनी एकत्र येऊन शांततेसाठी गृहरक्षक दलाची स्थापना केली. मात्र, मान्यवर नेत्यांनी अशा स्थितीत स्थापन केलेल्या या दलाला सध्या नव्या धोरणांमुळे आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्षात मात्र, अशा सेवाभावी कार्याला शासनकर्त्यांनीही मदत करावी .