इतिहासातील सूर्याजी पिसाळ राऊत यांच्या रूपाने जन्माला आला, नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:23 IST2023-07-13T16:21:48+5:302023-07-13T16:23:16+5:30

'तृतीयपंथी समाजाने माझे वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल'

History Suryaji Pisal was born as Sanjay Raut, Nitesh Rane's attack | इतिहासातील सूर्याजी पिसाळ राऊत यांच्या रूपाने जन्माला आला, नितेश राणेंचा हल्लाबोल

इतिहासातील सूर्याजी पिसाळ राऊत यांच्या रूपाने जन्माला आला, नितेश राणेंचा हल्लाबोल

कणकवली: छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत यांनी शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती. अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे संजय राऊत यांच्यावर केली.

कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी काल, बुधवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कलंकित राजकारणावर बोलताना त्यांनी आपल्या  फॅक्टरीत शेणाची खान आहे. त्याची माहिती पण द्यावी. राऊत यांच्या मालकाचा मुलगा त्यांना कलंकित वाटत नाही का ? त्या मालकाच्या मुलावर भ्रष्टाचाराचे तसेच अन्य गुन्हे दाखल आहेत. हा  कलंक  कसा पुसणार? 

जातीय वाद आणि धर्मभेद हे कोणी निर्माण केले हे जितेंद्र आव्हाड विसरले आहेत.आधी खरी राष्ट्रवादी कोणती हे त्यांनी सांगावे,  मग त्यांना जातीयवाद दाखवू.आमचे काय सुरू आहे हे पाहण्यापेक्षा जितेंद्र आव्हाड यांचे दुकान बंद झाले याची चिंता त्यांनी करावी. कारण सुळे गट म्हणजे मॉल दुकान असे राहिले नाही, तर ती पानपट्टी झाली आहे. कुडाळ मध्ये जे लोक राष्ट्रवादी म्हणून होते ते येत्या काही दिवसात अजित  पवार यांचे स्वागत करताना दिसतील.

तृतीयपंथी समाजाने माझे वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीर सभेतील  जे वक्तव्य आहे. तेच मी सांगितले आहे. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Web Title: History Suryaji Pisal was born as Sanjay Raut, Nitesh Rane's attack