शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

तळकोकणात 11 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 6:06 PM

भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सिंधुदुर्गनगरी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 11 जून 2018पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वे व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण कणकवली, देवगड, वैभववाडी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधून पावसाबद्दलच्या बातमीची खातरजमा करावी. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता आहे. अशावेळी नागरिकांनी संबंधित बाधित व्यक्तीस सहकार्य करावे.नागरिकांनी स्थानिक स्तरावर शोध व बचाव कार्यात सक्रिय रहावे. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरुक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे. पुरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरुक रहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी. जुन्या मोडकळीत आलेल्या इमारती, पूल अशा ठिकाणी जाऊ नये.अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे, जेसीबी मशीन इ. उपलब्ध करुन देण्यात नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग द्यावा. अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ. ठिकाणी जाऊ नये. सध्या जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अतिवृष्टी कालावधीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढण्यास जाऊ नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये. जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना नागरिकांनी त्या ठिकाणच्या धोक्यांची जाणीव करुन द्यावी व या पर्यटकांना देखील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यापासून परावृत्त करण्यात यावे. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.अफवांवर विश्वास ठेवू नयेपावसाच्या हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावरुन घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडूनच करुन घ्यावी .

टॅग्स :Rainपाऊस