शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:42 IST

कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्दे कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.रविवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. काही काळ ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यातच महामार्गाच्या शेजारी गटारे बांधण्यात न आल्याने पावसाचे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे.

पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पसरलेला चिखल काहीसा सुकत आहे. मात्र, या चिखलामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. तर वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या त्रासापासून आपल्याला कोण सोडविल का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार या समस्येकडे लक्ष देत नाही. तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; तरुणाईने लुटला पर्यटनाचा आनंदमहामार्गाचे काम करीत असताना गटारे तयार करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. काही विहिरींमध्ये हे पाणी जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गावर पसरल्याने त्यातून चालत जात असल्याने पादचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वातावरणात गारवा पसरला असून तापाचे अनेक रुग्ण ठिकठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रविवारी जोरदार पाऊस पडत असल्याने तरुणाईने धबधबे तसेच कासारटाका यासारख्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. शहरातील चिकन सेंटरवर ग्राहकांची गर्दी सकाळपासूनच दिसून येत होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्ग