दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 17:21 IST2021-04-12T17:20:40+5:302021-04-12T17:21:22+5:30
Rain Dodamarg Sindhudurg : दोडामार्ग तालुक्यात रविवारी सायंकाळी गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या लखलखाटासह संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची धावपळ उडाली. उष्म्याने वातावरणातील गाठलेला उच्चांक कमी झाल्याने गारवा निर्माण झाला.

दोडामार्ग तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस पडला.
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात रविवारी सायंकाळी गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या लखलखाटासह संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची धावपळ उडाली. उष्म्याने वातावरणातील गाठलेला उच्चांक कमी झाल्याने गारवा निर्माण झाला.
हवामान खात्याने रविवारपासून चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा व विजांचा लखलखाट सुरू होऊन पावसाच्या मुसळधार सरी अचानक बरसू लागल्या. संपूर्ण तालुक्यात अचानक पडलेल्या या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. एक तास जोराचा पाऊस कोसळला. रविवारी दिवसभर उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.