शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीकडून मनमानी?

By admin | Updated: June 8, 2015 00:49 IST

अनधिकृत बांधकाम : अधिकाऱ्यांविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

चिपळूण : सहहिस्सेदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्याची सहमती न घेताच त्याच्या जागेत अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्या फुणगूस ग्रामपंचायतीच्या विरोधात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभारामुळे नाराजी व्यक्त होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील मूळ रहिवासी राजेंद्र देसाई हे पोलीस खात्यात शिरगाव पोलीस ठाण्यात सेवेत आहेत. त्यांच्या मालकीच्या फुणगूस येथील सर्व्हे क्र. ७८, उपविभाग ९ मध्ये वडिलोपार्जित वहिवाटीनुसार लागलेल्या सहहिस्सेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता त्या जागेत घराचे बेकायदेशीर बांधकाम सुरु केले. ही जागा सामायिक असून, अद्याप त्याची वाटणीही झालेली नाही. या ठिकाणी बांधकाम होत असल्याने हे बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी करणारे निवेदन देसाई यांनी ग्रामपंचायतीला २० फेब्रुवारी २०१४ रोजी दिले. ग्रामपंचायतीकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याने त्यांनी गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. फुणगूस ग्रामपंचायतीने घर बांधण्यासाठी परवानगी देताना सहहिस्सेदारांची संमती घेतलेली नाही. सहहिस्सेदारांना यावेळी गृहित धरण्यात आले. गावात अशा अनेक घटना घडत असतात. जमिनीचे कोणतेही मोजमाप झालेले नसताना विनापरवाना बांधलेले घर हटवावे, यासाठी मागणी करुनही ग्रामपंचायत चालढकल करीत आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात राजेंद्र देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याविरोधात न्याय मागण्यासाठी निवेदन दिले आहे. देसाई हे पोलीस खात्यात असल्याने त्यांना पुरेशा रजा मिळत नाहीत. अशाही स्थितीत आपले वडिलोपार्जित घर असलेल्या फुणगूस गावी घराच्या दारासमोरच आजगावकर यांचे अनधिकृत बांधकाम सुरु झाले. त्यामुळे देसार्इंना अडचण होऊ लागली. सहहिस्सेदारांची संमती नसल्याने परवानगी देण्याबाबत अडचण असल्याचे ग्रामसेवकांनी मिटिंगमध्ये सांगितले. परंतु, सरपंच दिनेश गुरव व इतर सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन घराला परवानगी दिली. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत देसाई गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडेही सातत्याने दाद मागून त्यांच्याकडूनही अपेक्षित कार्यवाही झाली नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देसाई यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनानंतर आता पुढे कोणती कार्यवाही करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फुणगूस भागात सहहिस्सेदाराची परवानगी न घेताच हे बांधकाम करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला याबाबत आता स्पष्ट काही आठवत नाही. आम्ही त्यावेळी योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले होते. त्याची चौकशी वगैरे झाली असेल. याबाबत आपण पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश कुलकर्णी यांच्या काळातच आले होते. परंतु, त्या निवृत्त होणार असल्याने त्यांनी अंमलबजावणीस चालढकल केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी तलाठी भुते यांच्याशी संपर्क साधला असता आपण याप्रकरणी चौकशी करत असून, सरपंच व ग्रामसेवक यांचेही जाबजबाब घेतले जाणार आहेत. आपला वस्तुनिष्ठ अहवाल मंगळवारपर्यंत वरिष्ठांकडे पाठवला जाईल, असे त्यांनी सांगितले. बांधकामाला परवानगी देणे किंवा काढून टाकणे, हा अधिकार ग्रामपंचायतीला असल्याने मुळात या बांधकामाला परवागनी दिली कशी? यासाठीच ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी होणे आवश्यक आहे. देसाई यांनी वर्षा हेमंत आजगावकर यांच्या बांधकामाविरोधात २० फेब्रुवारीला हरकत घेणारा अर्ज ग्रामपंचायतीला दिला. या अर्जाचे वाचन मासिक मिटिंगमध्ये न करताच ग्रामसेवकांनी २६ मार्च २०१४ रोजी आजगावकर यांनी घरबांधणीसाठी मागितलेल्या परवाण्याचा अर्ज २७ मार्च रोजी मासिक मिटिंगमध्ये वाचून त्याला मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देताना सहहिस्सेदाराच्या तक्रार अर्जाचा विचारही केला गेला नाही. शिवाय माहितीच्या अधिकाराखाली ग्रामसेवकाकडे माहिती मागितली असता तीही अपुरी माहिती देण्यात आली.