शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मित्राकडून मैत्रिणीला चार लाखांचा गंडा

By admin | Updated: October 9, 2014 23:04 IST

सावंतवाडीतील घटना : लग्नाचे आमिष दाखवत एटीएमसह दागिने लांबविले

सावंतवाडी : सावंतवाडीतील युवकाने मैत्रीचा गैरफायदा घेत मैत्रिणीलाच तब्बल चार लाखांना गंडा घातल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. भेटण्याच्यानिमित्ताने घरात जाऊन एटीएम कार्डसह दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात करत युवकाने लग्नाचे आमिष दाखवत त्या युवतीला कर्नाटकात नेऊन ठेवले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला आहे. पोलिसांनी या युवकावर सध्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हुसेन राजसाब मुजावर (वय २१ रा. सावंतवाडी) असे या युवकाचे नाव असून सध्या तो फरार आहे. दरम्यान, या युवकाच्या सततच्या प्रतापाने शहरातील अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सावंतवाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी राहत असलेल्या हुसेन मुजावर याने माजगाव गरड येथे राहत असलेल्या एका युवतीशी मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर सहा महिन्यांपूर्वी प्रेमात झाले होते. या प्रेमातूनच तो युवक सतत तिच्या घरी येत जात असे. त्यातून त्याचे लक्ष युवतीच्या घरातील एटीएम कार्डवर गेले आणि एटीएम कार्ड चोरले. ही बाब तिच्या घरच्यांना तब्बल चार महिन्यांनी लक्षात आली. त्या युवकाने एटीएम काडद्वारे बांदा, पेडणे व गोवा येथील एटीएम मशीनमधून तब्बल अडीच लाख रूपये काढले.ही एटीएम कार्डची चोरी कोणाच्या लक्षात आली नाही, असे या युवकाच्या लक्षात येताच तब्बल १ लाख १० हजार रूपये किमतीचे युवतीच्या मावशीचे दागिनेही त्याने चोरले. मात्र, महिनाभरापूर्वी या युवतीच्या घरात पैशांची गरज असल्याने तिच्या नातेवाईकाने बँकेचे पासबुक येथील बँॅकेत नेले. त्यावेळी बँॅक खात्यात असलेले अडीच लाख रुपये नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या लक्षात आणून देताच हा सगळा प्रकार पुढे आला. युवतीही घाबरली होती. त्यावेळी आपल्यावर प्रेम करणाऱ्या हुसेननेच हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्या युवतीला आला. तिने घरच्यांना सांगितले. त्यावेळी हा सर्व प्रकार पुढे आला. या एटीएम कार्डबरोबरच त्याने मावशीचे सव्वा लाख रूपयांचे दागिने लांबविल्याचा प्रकारही यावेळी उघडकीस आला. (प्रतिनिधी)एटीएम, दागिन्याबरोबर युवतीला पळविण्याचा डावहुसेन याने आपली मोहिनी युवतीवर टाकत काही दिवसांपूर्वी त्या युवतीला पळवून नेण्याचा डाव आखला होता. तिला बेळगाव येथे काही दिवस नेऊनही ठेवले होते. पण ती त्याच्या कचाट्यातून निसटून दोन दिवसांपूर्वीच सावंतवाडीत आली. त्यानंतर त्याचे अनेक प्रताप बाहेर आले आहेत. त्या युवतीने झालेला प्रकार पोलिसांना तसेच आपल्या कुटुंबाला सांगितला आहे. पोलिसांनी हुसेन यांच्या विरोधात सध्यातरी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सध्या तो फरार असून दोन दिवसांपूर्वी हा युवक पोलीस ठाण्यात आला होता. मात्र, त्याचा जबाब घेऊन पोलिसांनी त्याला सोडून दिले होते.युवकाच्या प्रतापापुढे पोलिसांनी हात टेकलेतीन महिन्यात तब्बल चार ते पाच मुलींच्या तक्रारी तसेच भरवस्तीत गाडी घुसवल्याचे प्रकार हुसेनने केले आहेत. मात्र, सावंतवाडी पोलीस हुसेन याला पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. एक कॉन्स्टेबल या प्रकाराची चौकशी करीत असून, यापूर्वीच्या अनेक प्रकरणात हुसेन दोषी असतानाही शहरात बिनधास्तपणे फिरत आहे. यामुळेच दररोज नवनवीन प्रकरणे करत असल्याचे पुढे येत आहे.