शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दोन टन काजू बी लंपास करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश, एलसीबीने चौघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:55 IST

कातकरी समाजातील तरुणांसह काजू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल

कणकवली : तालुक्यातील कोंडये, वरचीवाडी येथील दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन टन काजू बी चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने चार आरोपींना गजाआड केले आहे. कातकरी समाजातील तीन आरोपी या गुन्ह्यात सहभागी असून त्यांनी विरण, पोईप परिसरामध्ये काजू बीची विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे.कोंडये येथे दत्तात्रय तेंडुलकर आणि विलास तेंडुलकर यांची सात एकर क्षेत्रात काजू बागायत आहे. या बागायतीमध्ये एक हजार काजूची झाडे आहेत. तसेच पक्का चिरेबंदी शेतमांगर देखील बांधण्यात आला आहे. या शेतमांगरामध्ये त्यांनी काजू बियांचा साठा करून ठेवला होता. २३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास ते शेतमांगरामध्ये शेतीसाहित्य आणण्यासाठी आले असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता मांगरातील दोन टन काजू साठा गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तेंडुलकर यांनी या चोरी प्रकरणी कणकवलीपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपास सुरु केला. दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. गुन्ह्यात कातकरी समाजातील तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी पप्या सुनील पवार (वय २६, गणपती साना, कणकवली), संदीप सुरेश पवार (२३, पोईप, वडाचा पाट), बंटी स्वप्नील पवार (२२, गणपतीसाना,कणकवली) व ज्या गाडीतून या काजू बियांची वाहतूक केली त्या अनंत मधुकर परब (रा. पोईप) या गाडी मालकाला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.पोलिसांनी काजू बियांची वाहतूक करण्याकरता वापरलेला टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर, ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी आदींच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Police bust cashew theft, four arrested by LCB.

Web Summary : Sindhudurg police arrested four for stealing two tons of cashews worth ₹320,000 from a farm in Kondye. The local crime branch (LCB) suspects the accused Katkari community members sold the stolen goods in Viran and Poip areas. The vehicle used in the crime has been seized.