शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: September 29, 2014 00:02 IST

तोंडवळीतील घटना : मारहाणप्रकरण

मालवण : तोंडवळी सापळेबाग येथील समुद्रात पारंपरिक मच्छिमारांपैकी आनंद गोपाळ खडपकर (वय २५, रा. तोंडवळी) यांसह अन्य चारजणांना गैरकायदा जमाव करून मारहाण केल्याप्रकरणी मिनी पर्ससीन मच्छिमार आबा मुणगेकर (रा. आचरा हिर्लेवाडी) यांच्यासह पाच जणांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तळाशिल येथील हेमंत तुकाराम खडपकर हे आपली रामेश्वर कृपा ही फायबर पात घेऊन शनिवारी सकाळी ६.३० वाजता आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आनंद खडपकर, सदानंद कोचरेकर, तुकाराम खडपकर हेही मासेमारीसाठी गेले होते. याचवेळी १० ते १२ मिनी पर्ससीननेट नौका त्या ठिकाणी मच्छिमारी करत होत्या. यावेळी खडपकर यांसह पारंपरिक मच्छिमारांनी मिनी पर्ससीननेटधारकांना अनधिकृत मासेमारी करण्यास अटकाव केला. याचा राग येवून मिनी पर्ससीननेटधारकांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर खडपकर यांनी आपल्या साथीदारांसह आपली पात तोंडवळी येथील समुद्रात आणली. तोंडवळी सापळेबाग येथे मासेमारी करत असताना ११ वाजण्याच्या दरम्यान खडपकर यांच्या पातीशेजारी तीन मिनी पर्ससीन बोटी आल्या. त्यांच्यापैकी पेडणेकर रापण संघाच्या बोटीतील आबा मुणगेकर यांच्यासह चारजण खडपकर यांच्या पातीवर चढले व त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आबा मुणगेकर याने आनंद खडपकर यांना काठीने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तसेच इतरांनी खडपकर यांच्या पातीवरील खलाशांना मारहाण केली. या प्रकरणी आबा मुणगेकर, रियान मुजावर, किशोर तोडणकर यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एल. एल. कचरे, विठ्ठल जोशी, फिरोज तडवी हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)