शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

सत्तेत येण्यासाठी मच्छिमारांचा वापर केला : परशुराम उपरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:33 IST

पारंपरिक मच्छिमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली पंधरा वर्षे पर्ससीननेट मासेमारीचा प्रश्न प्रलंबित ठेवत मच्छिमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले.

ठळक मुद्देसत्तेत येण्यासाठी मच्छिमारांचा वापर केला : परशुराम उपरकर  पारंपरिक मच्छिमार जो निर्णय घेतील मनसे त्यांच्या पाठीशी

सिंधुदुर्ग : पारंपरिक मच्छिमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली पंधरा वर्षे पर्ससीननेट मासेमारीचा प्रश्न प्रलंबित ठेवत मच्छिमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले.

सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी मच्छिमारांचा वापर केला. मात्र, आता पारंपरिक मच्छिमार जो निर्णय घेतील त्याला मनसेचा पूर्णत: पाठिंबा राहील, असे मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.रेवतळे येथील विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, गणेश वाईरकर, भारती वाघ, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रिक्स, आबा आडकर, गुरू तोडणकर, सचिन गावडे, प्रणव उपरकर यांच्यासह मनसेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोषयावेळी उपरकर म्हणाले, मागील निवडणुकीत पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मच्छिमारांचे प्रश्न अधांतरीच ठेवण्याचे काम केले. जे सत्ताधारी मत्स्य व्यवसाय खात्यातील रिक्त पदे भरू शकत नाहीत ते मच्छिमारांना काय न्याय देणार?

मच्छिमारांच्या प्रश्नांवर केवळ मंत्र्यांच्या भेटी घेत छायाचित्रे काढण्याची कामे खासदार, आमदारांनी केली. मात्र, जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील एलईडी, पर्ससीननेटसह परप्रांतीय हायस्पीडद्वारे घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात पारंपरिक मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.उद्योजकांना अडचणीत आणण्याचे कामतारकर्ली, देवबागसह किनारपट्टी भागात पर्यटन व्यावसायिकांनी इमारती उभारल्या. त्यामुळे त्यांना महसूलकडून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या. यात आमदारांनी या उद्योजकांना दंड कमी करून आणतो असे सांगून फसवणूक केली आहे.

प्रत्यक्षात यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कोणताही आदेश प्राप्त नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. याचबरोबर ५० मीटरचा सीआरझेडचा प्रश्न, मच्छिमारी वस्त्या, कोळीवाडे यांचा प्रश्न सुटलेला नसतानाही विद्यमान खासदार मच्छिमारांच्या समस्या दूर करू असे सांगून फसवणूक करीत आहेत. शिवाय उद्योजकांना अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग