शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

By admin | Updated: December 26, 2014 00:50 IST

खोल समुद्र : भारत सरकारच्या संकेत स्थळावर उपलब्ध

ओरोस : खोल समुद्रातील मासेमारीसाठी (डीप सी फिशिंग) नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याबाबत सविस्तर अहवाल भारत सरकारच्या पदुम विभागाच्या ६६६.ंिँ.िल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ँ३३स्र://ंिँ.िल्ल्रू.्रल्ल/ ्िर५्र२्रङ्मल्ल/ा्र२ँी१्री२.ं२स्र७ या स्थळावरसुद्धा डीपसीबाबतचे सर्व आदेश उपलब्ध आहेत. या आदेशाच्या महत्त्वाच्या व्याख्या, मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.विशेष आर्थिक प्रभाग- भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून २०० सागरी मैलांपर्यंत आणि राज्याच्या जलधीक्षेत्रालगत व पलीकडील क्षेत्र, खोल समुद्रातील मासेमारी सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापलीकडील (राज्याच्या जलधीक्षेत्र बाहेरील) मासेमारी, खोल समुद्रातील मासेमारी नौका १५ मीटर व त्यावरील सर्वसाधारण लांबी असणाऱ्या मासेमारी नौका या प्रकारात येतात. कोणताही भारतीय व्यावसायिक, भागीदारी फर्म, खासगी मर्यादित कंपनी, सार्वजनिक मर्यादित कंपनी व महामंडळ, कोणत्याही मासेमारी नौकेस विस्तृत आर्थिक प्रभागमध्ये मासेमारीकरता चालवावयाची असेल तर लेखी परवानगी आवश्यक आहे. खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकेस केंद्र, केंद्रशासित प्रदेश, राज्य यांचे शासनाने यांत्रिक व पारंपरिक मासेमारी नौकांच्या साहाय्याने मासेमारी मच्छिमारांसाठी सागरी मासेमारी नियमन अधिनियमान्वये वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार वा कार्यकारी आदेशानुसार ठरवून दिलेल्या सागरी जलक्षेत्रात, राज्यांच्या जलधीक्षेत्रात व बंदी कालावधीत मासेमारी करता येणार नाही.खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौका चालकास ज्या प्रकारचे मासेमारीसाठी परवानगी दिली आहे, त्या प्रकारचीच मासेमारी करता येईल. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये संरक्षित प्रजाती पकडता येणार नाहीत. बॉटम ट्रॅव्हलिंग, पेअर ट्रॅव्हलिंग, बुल ट्रॅव्हलिंग प्रकाराने मासेमारी करता येणार नाही. कोड आॅफ कंडक्ट फॉर रिस्पॉन्सिबल फिशरीज पाळावा लागेल. यासाठी विहित नमुन्यात शपथपत्र द्यावे लागेल. खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकेस तिच्या अवागमनाची व खलाशांची माहिती तटरक्षक दलास जाण्यापूर्वी व परत आल्यावर देणे बंधनकारक आहे. एमएमडी वा अन्य अधिसूचित यंत्रणेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मासेमारी करणाऱ्या नौकेस दिलेली मासेमारी परवानगी या अध्यादेशानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यास रद्द करण्यात येईल व या नौका अवरूद्ध करण्यात येईल, असे राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी कळविले आहे. (वार्ताहर)