शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रवेशोत्सवा’ने भारावले पहिलीकर

By admin | Updated: June 16, 2016 01:05 IST

पालकांनी केले कौतुक : शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर

सिद्धेश आचरेकर --मालवण  -शाळा ही संस्काराची पहिली पायरी असते. शिक्षणाच्या माध्यमातून उद्याची सुशिक्षित पिढी घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजेच पहिलीपासून शिक्षणाची गोडी लागावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्याच्या आदेशाचे पालक तसेच शिक्षकवर्गातून कौतुक होत आहे. गेली चार वर्षे नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम केला जात असल्याने पहिलीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही जी भीती असायला हवी ती दूर होत आहे. आपले शिक्षक आपले स्वागत करत आहेत, हे पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. उन्हाळी हंगामाची सुट्टी संपल्यानंतर बुधवार १५ जूनपासून पुन्हा प्राथमिक शाळेत मुलांचा किलबिलाट सुरु झाला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळात पहिलीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी काही शाळात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात गावपातळीवरील प्रमुख ग्रामस्थ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मान्यवर व्यक्तींनी प्राथमिक शिक्षणाचे महत्व विशद करताना सातत्य आणि नाविन्यपूर्ण अभ्यास करून शाळेचे नावलौकिक वाढवा, असे आवाहन केले. ‘प्रवेशोत्सवा’चा कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील २०७ शाळात ७९१ विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतला आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, वसंत महाले, उदय दीक्षित तसेच पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, उपसभापती छोटू ठाकूर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीतील विविध विभागाच्या खातेप्रमुखांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. निरागस चेहऱ्यांना शिकण्याची प्रचंड उमेदशाळा म्हटली ही पोटात गोळा येणे हे शाळकरी मुलांचे समीकरणच असते. पहिलीतल्या त्या चिमुकल्या मुलांना बालवाडीत असताना शाळेचे आकर्षण असते खरे मात्र शाळेचा पहिला दिवस म्हटला की पालकांना जबरदस्तीने शाळेत घेवून जावे लागते. मात्र शासनाच्या ‘प्रवेशोत्सवा’च्या निमित्ताने मुलांमधील शाळेप्रती असलेली भीती बऱ्यापैकी दूर झाली आहे. पहिल्याच दिवशी होणारे शिक्षकांकडून होणारे स्वागताने या निरागस चेहऱ्यांना शिकण्याच्या प्रचंड उमेद निर्माण झालेली असते.विद्यार्थ्यांमधील भीती दूर होण्यास मदतशासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांना शाळेविषयी आस्था वाटू लागली आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. प्रवेशोत्सव कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.