शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

मळगावात मान्यवरांचा सत्कार

By admin | Updated: January 5, 2015 22:05 IST

शतकमहोत्सव: शारदा विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

तळवडे : येथील शारदा विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रस्तावाडाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील ४० जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडे, राजेंद्र परब, जिल्हा परिषद कामगार अधिकारी शेखर पाडगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. मळगावात ज्येष्ठ व्यक्ती या शिक्षण व्यवस्था योग्यप्रकारे हाताळत आहेत. येथील सामाजिक विकासाला वाहून घेणाऱ्या व्यक्तीची आदर्श, प्रेरणा आजच्या तरुण पिढीने घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य खात्याचे सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी येथे केले. कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपालिका सभापती वैशाली पटेकर, मळगाव सरपंच नीलेश कुडव, सावंतवाडी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, बँक आॅफ इंडिया सावंतवाडीचे शाखाव्यवस्थापक नंद प्रभूदेसाई, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र परब, शिवाजीराव देसाई, दिलीप सोनुर्लेकर, रमेश कासकर, प्रा. गणपत शिरोडकर, शिवाजी देसाई, गीता सामंत, चंद्रकांत सामंत, दिगंबर सामंत, डी. के. गावकर, तेजपाल सावळ, आनंद देवळी, महेश शिरोडकर, अर्जुन देवळी, दिवाकर राऊळ, गंगाबाई गोवेकर, रवींद्र कांबळी व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)केंद्रशाळांमध्ये इंटरनेट सुविधाजिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १४४ जिल्हा परिषद केंद्र शाळांमध्ये ई- लर्निंग व इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेने प्रथमच असा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिली.