शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

उपोषण तिसऱ्या दिवशी मागे, नीतेश राणेंची शिष्टाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 3:08 PM

मालवण : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजप गटनेते ...

ठळक मुद्देउपोषण तिसऱ्या दिवशी मागे, नीतेश राणेंची शिष्टाईआर्थिक गैरव्यवहारप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

मालवण : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजप गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेतले. आमदार नीतेश राणे यांनी यशस्वी शिष्टाई करताना पालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडू तसेच हिवाळी अधिवेशनातही यावर आवाज उठवून उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे स्पष्ट केले.दरम्यान, आमदार राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी कुशे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांना शीतपेय भरवले. त्यानंतर कुशेंनी बेमुदत उपोषण मागे घेतले. यावेळी राणे यांनी स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला.मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी ठेकेदाराकडून पैसे उकळवित आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप मालवणचे नगरसेवक गणेश कुशे यांनी करत ४ डिसेंबरपासून मालवण नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. याबाबत कुशे यांनी नगराध्यक्षांची प्रशासनाकडे लेखी तक्रार करीत भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. कुशे यांनी सुरू केलेल्या या उपोषणातील दखल प्रशासनाने घेतली नाही उलट जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय आपल्याकडे येत नाही असे सांगत हात झटकले होते.तीन दिवस उपोषण सुरू असल्याने कुशे यांची प्रकृती ढासळली होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आमदार राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, नगरसेवक आप्पा लुडबे, पूजा करलकर, पूजा सरकारे, प्रमोद करलकर, संतोष गावकर, धोंडी चिंदरकर, रविकिरण तोरसकर, आबा हडकर, भाई मांजरेकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते.कुशे यांनी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी राणे यांनी मालवण नगरपालिकेचा कारभार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत होता. मात्र शिवसेनेचा नगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यानंतर भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर येऊ लागले आहेत. हे सर्व पुरावे जनतेसमोर असताना त्याची दखल न घेणे म्हणजे मतदारांना फसवण्यासारखे आहे, असे सांगितले.कारवाई करण्यास भाग पाडूनगराध्यक्षांवर कारवाई व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. नगराध्यक्षांनी पदाच्या केलेल्या गैरवापराबाबत स्थानिक आमदार नाईक हे हस्तक्षेप करत असून या प्रकरणात सर्वच लोकांचे साटेलोटे असल्याचा आरोप राणेंनी केला. या संपूर्ण प्रकरणात माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या सहकार्यातून प्रकरण तडीस नेण्यात येईल. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यास भाग पाडू, असेही आमदार राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग