शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सेविकांकडे कामाचा अतिरिक्त ताण

By admin | Updated: March 3, 2015 00:35 IST

कदम : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची सभा

कणकवली : मुख्य सेविकांना त्यांच्या जॉबचार्ट व्यतिरिक्त कामे त्यांच्यावर लादल्याने कामाचा प्रचंड भार निर्माण झाला आहे. सांख्यिकी विस्तार अधिकारी पदे व्यपगत झाल्याने हा कार्यभार मुख्य सेविकांना दिलेला आहे. अंगणवाडी केंद्रांना भेटी देणे व त्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येत नाही. त्यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची उद्दिष्ट्ये व हेतू साध्य करणे मुख्य सेविकांना शक्य होताना दिसत नाही, असे प्रतिपादन कास्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी केले.कास्ट्राईब जिल्हा परिषद मुख्य सेविका कर्मचारी कल्याण महासंघाची सभा जिल्हाध्यक्षा संचिता कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कुडाळ पंचायत समिती येथे सावित्रीबाई फुले सभागृहात झाली. यावेळी संदीप कदम बोलत होते. जिल्हा पदाधिकारी एम. आर. सुतार, एम. जी. मेडवे, व्ही. व्ही. कोतगी, के. पी. वाढोकर, सी. ए. घाडीगावकर, शर्मिला सावंत, वळवी, एस. आर. नाईक, वायकुंटे, ए. बी. धुपकर, कविता गवाणकर, स्नेहा सामंत, आदी उपस्थित होते.कदम म्हणाले, नियमितपणे सांख्यिकी विस्तार अधिकारी पदाचे काम करण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहावे लागत आहे. तसेच मुख्य सेविकांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत जॉबचार्टमध्ये नसलेली जोखमीची बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील कामे करावी लागत आहेत. यावेळी जिल्हाध्यक्षा संचिता कुडाळकर, एस. के. गायकवाड, एस. एस. पवार, प्राजक्ता तुळसकर, एल. एस. कासले यांनी मार्गदर्शन केले. आभार जी. ए. पाटकर यांनी मानले. (प्रतिनिधी)अन्यथा बेमुदत साखळी उपोषणमुख्यसेविकांना वेतनश्रेणी देण्यासही विलंब होत आहे. दोडामार्ग मुख्यसेविका आराधना धुपकर यांची सेवा जोडून देण्यास सहविचार सभेला मान्यता दिली असतानाही विलंब होत आहे. अशा अनेक महत्त्वपूर्ण समस्यांबाबत महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करूया, अन्यथा बेमुदत साखळी उपोषणास बसुया, असे कदम यांनी सांगितले.