शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पाईप लाईनच्या कामात त्रुटी

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

आढावा बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हापसेकरांचा आरोप

सावंतवाडी : तिलारी ते वेंगुर्लेकडे जाणाऱ्या नळपाणी योजनेच्या कामात मोठ्या त्रुटी आहेत. दोडामार्गमधील ज्या रस्त्यावरून पाईपलाईन घातली जात आहे, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू शकतात. याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारण्यास गेल्यावर ते खोटेनाटे घाणेरडे आरोप करतात, अशा अनेक तक्रारी दोडामार्गचे जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केल्या.सावंतवाडी विश्रामगृहावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर, सभापती महेश गवस, आनंद रेडकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, बांधकाम अभियंता प्रकाश शिंदे, जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी तसेच खारभूमीचे अभियंता संदीप फुदे, तहसीलदार सतीश कदम आदी उपस्थित होते.यावेळी प्रथम खारभूमीबाबत चर्चा झाली. या चर्र्चेतून खारभूमीची ५० कोटीची कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच त्यानंतर तिलारीहून वेंगुर्लेकडे जाणाऱ्या पाईप लाईनच्या कामाबाबत राजन म्हापसेकर यांनी आपली भूमिका मांडली. यात कंपनी योग्य पध्दतीने काम करीत नाही. तसेच ज्या रस्त्यावरून पाईप लाईन टाकण्यात येत आहे, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे मारले जात असून ते बुजविले जात नाहीत आणि जाब विचारल्यास उध्दट उत्तरे ऐकण्यास मिळतात, अशा तक्रारी करत, जर पावसात एखादा जरी अपघात झाल्यास काम होणार नाही, असा इशारा यावेळी म्हापसेकर यांनी दिला. यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, यापुढे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल. तसेच कामावर जीवन प्राधिकारण तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आपला प्रतिनिधी ठेवतील. रस्ता खोदाई केली, तर त्याबाबतचे पैसे कंपनीने बांधकाम विभागाकडे भरले असून, ज्या ठिकाणी रस्ता खोदाई झाली, तेथे रस्ता योग्यप्रकारे केला जाईल, असे आश्वासन कंपनीने दिल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आरोपाबाबत खेदजिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो. ते चांगले काम करीत असून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा आदर केला पाहिजे, त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवू नये, अशा कडक सूचना यावेळी दीपक केसरकर यांनी बैठकीत दिल्या.