शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

फेब्रुवारीअखेर लॉटरीद्वारे निश्चित होणार २४० लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 3:42 PM

Devgad home sindhudurg- देवगड-जामसंडे नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सर्व्हे क्रमांक ९०/१ए मधील १.६० हेक्टर जागेत सामान्यांना परवडणाऱ्या २४० घरांचा बहुमजली गृहप्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यास सर्व आधुनिक सोयी-सुविधायुक्त ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असलेला १ बी.एच.के. सदनिका (ज्यामध्ये एक बैठक खोली, एक झोपण्याची खोली, स्वयंपाकघर, स्वतंत्र स्नानगृह व शौचालय असेल) देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारीअखेर लॉटरीद्वारे निश्चित होणार २४० लाभार्थी देवगड-जामसंडे नगरपंचायत : प्रधानमंत्री आवास योजना

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सर्व्हे क्रमांक ९०/१ए मधील १.६० हेक्टर जागेत सामान्यांना परवडणाऱ्या २४० घरांचा बहुमजली गृहप्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यास सर्व आधुनिक सोयी-सुविधायुक्त ३० चौरस मीटर चटई क्षेत्र असलेला १ बी.एच.के. सदनिका (ज्यामध्ये एक बैठक खोली, एक झोपण्याची खोली, स्वयंपाकघर, स्वतंत्र स्नानगृह व शौचालय असेल) देण्यात येणार आहे.या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी जे नागरिक यापूर्वी अर्ज करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असून, १९ फेब्रुवारी अखेरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. तसेच यापूर्वी ज्या नागरिकांनी सर्वांसाठी घरे अंतर्गत अर्ज केले आहेत, त्यांनादेखील याच कालावधीत ५००० रुपये भरून लॉटरीमध्ये आपला सहभाग निश्चित करावयाचा आहे, असे आवाहन देवगड जामसंडे नगर पंचायतीच्यावतीने केले आहे. सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कोणताही नागरिक या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता दक्षता घ्यावी, असेही नमूद केले आहे.या योजनेअंतर्गत वर नमूद सदनिकेची किंमत ९,०६,९७० रुपये (फक्त १ टक्का जीएसटी १००० रुपये स्टॅम्प ड्युटीसह) असून, या घराच्या खरेदीसाठी पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत एकूण रुपये २,५०,००० चे अनुदान प्राप्त होणार आहे. लाभार्थ्याला हे अनुदान वगळता उर्वरित रक्कम ६,५५,९७० रुपये त्याच्या कर्ज परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार पात्र होणारे बँकेचे कर्ज व लाभार्थ्याने केलेल्या बचतीतून भरावी लागणार आहे.ही सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त होणार असल्याने या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पन्न मर्यादेनुसार सुलभ हप्त्याने बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रती गृहसंकुल सदनिका क्रमांक निश्चित करण्यासाठी लॉटरी काढण्यात येईल.अर्जदारास घर प्राप्त न झाल्यास रक्कम परतदेवगड जामसंडे नगरपंचायत यांच्या गृहप्रकल्पामध्ये घर घेण्यासाठी नगरपंचायत हद्दीतीतील नागरिकांनी सोडतीमध्ये सहभागी होऊन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. आपले हक्काचे घरकुल निर्माण करण्यासाठी ५००० रुपये भरून आपल्या नावाची नोंद करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त अर्जधारकांच्या यादीमधून लॉटरीद्वारे २४० लाभार्थी निश्चित केले जाणार आहेत. ज्या अर्जदारास सोडतीमध्ये घर प्राप्त होणार नाही, अशा अर्जदारास त्याची भरलेली रक्कम सोडतीनंतर पंधरा दिवसांत परत करण्यात येईल.

टॅग्स :HomeघरDevgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग