शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कणकवलीतील अतिक्रमण नगरपंचायतीने हटविले, कारवाईदरम्यान वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:41 AM

कणकवली शहरातील लक्ष्मी चित्रमंदिरसमोरील मसुरकर किनई रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई  सुरू केली. मात्र, तेथील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांनी या कारवाईला विरोध केला. अतिक्रमण हटवायचे असेल तर त्याबाबत आधी लेखी नोटीस द्या किंवा सोमवारपर्यंतचा वेळ द्यावा, आम्ही स्वत:हून बांधकाम काढतो, असे त्यांचे म्हणणे होते.

ठळक मुद्देमसुरकर किनई येथील बांधकाम : अतिक्रमण नगरपंचायतीने हटविलेकारवाईदरम्यान गाळेधारक, मुख्याधिकाऱ्यांमध्ये वादंग

कणकवली : कणकवली शहरातील लक्ष्मी चित्रमंदिरसमोरील मसुरकर किनई रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई  सुरू केली. मात्र, तेथील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांनी या कारवाईला विरोध केला. अतिक्रमण हटवायचे असेल तर त्याबाबत आधी लेखी नोटीस द्या किंवा सोमवारपर्यंतचा वेळ द्यावा, आम्ही स्वत:हून बांधकाम काढतो, असे त्यांचे म्हणणे होते.तर येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत आम्ही गेला दीड महिना तुम्हांला विनंती करीत आहोत. मात्र, तुम्ही अतिक्रमण हटविले नाही, त्यामुळे आता नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही. येथील अतिक्रमण आम्ही काढणारच, असा पवित्रा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकीर्डे यांनी घेतला होता.कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि कणकवली शहरातील गाळेधारक अमिता कुलकर्णी यांच्यात अतिक्रमण हटविण्याबाबत वादंग सुरू असताना तेथे डॉ. शमिता बिरमोळे आणि डॉ. संदीप नाटेकर आले. त्यांनीही येथील बांधकाम हटविण्यात येत असल्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ती हटविण्याची कारवाई होत नाही. मात्र येथे तातडीने बांधकाम हटविले जाते असा वेगवेगळा न्याय का? असाही प्रश्न कुलकर्णी यांनी विचारला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी मला शासनाने जे काम नेमून दिले आहे ते मी करणारच अशी भूमिका मांडली.सुमारे दोन तास येथील बांधकाम हटविण्यावरून मुख्याधिकारी आणि उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, कोणताच तोडगा निघत नव्हता. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मागविला. तसेच विनाकारण वाद घालत बसलात तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर गाळेधारक आणि उपस्थितांनी नमते घेतले तर नगरपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढे सुरू करण्यात आली.या कारवाईच्यावेळी नगरपंचायतीचे भाई साटम, विश्वनाथ शिंदे, विभव करंबेळकर, बांधकाम अभियंता सागर कुंभार, मनोज धुमाळे, सचिन नेरकर, पोलीस हवालदार दयानंद चव्हाण, विनिता भुजे आदी उपस्थित होते.सर्वांना सारखेच नियम लावाकणकवली शहरात महामार्गावर अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. नगरपंचायत ती तोडत नाही. मग इथेच कारवाईचा बडगा का उचलता? नियम लावायचेच असतील तर सर्वांना सारखेच लावा, असे डॉ. शमिता बिरमोळे व डॉ. संदीप नाटेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना यावेळी सुनावले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग