शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाऊस हटेना; शेतात चिखल, कापणी करायची कशी?, भात उत्पादनावर होणार परिणाम

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 1, 2024 12:16 IST

सुगी तोंडावर अन् परतीचा पाऊस मुळावर

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : परतीच्या पावसाचे ढग जिल्ह्यातून हटण्याचे नावच घेत नाहीत. गेले आठ ते दहा दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भाताच्या शेतात चिखल झाला आहे. पाणी साचून राहिल्याने काढणीला आलेले पीक काढणीविना वाया जात आहे.ऑक्टोबर महिन्याचा गुरूवार ३१ हा शेवटचा दिवस संपला तरी पाऊस काही जाण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज सायंकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे कापणीला आलेले भातपीक शेतात आडवे झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ही स्थिती आहे. विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बळीराजा चिंताग्रस्तजिल्ह्यात ५५ ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीला बहर आला आहे. पाऊस उत्तम झाल्याने भातपीक चांगले भरून आले आहे. त्यामुळे यंदा भाताचे उत्पादनवाढीची शक्यता होती. मात्र, परतीच्या पावसात भाताची नासाडी होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

तयार झालेल्या भातपीकाची दैनागेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने विविध ठिकाणी थैमान घातले आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सायंकाळी विजांचा आणि ढगांचा गडगडाट होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाहले आहे. नवरात्री उत्सवादरम्यान किवा दसऱ्यानंतर शेतकरी शक्यतो तयार झालेले पीक कापण्यास सुरूवात करतात. मात्र, पाऊस लांबल्याने तयार झालेल्या भाताची दैना झाली असून आता त्यापैकी घरात किती येणार हा प्रश्नच आहे.

नुकसान भरपाई द्यावी

  • ऐन दिवाळीत बळीराजाची दिवाळी शेतात तर मोत्याचे धान चिखलात लोळत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट नुकसानभरपाई जाहीर करून ती द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत चार हजार मिलीमीटरच टप्पा गाठला असून ही गेल्या चार वर्षातील विक्रमी नोंद आहे.
  • आता परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. शेत लागवडीसाठी खर्च केलेले पैसेसुद्धा पदरात पडणार की नाही. या विवंचनेत येथील शेतकरी आहे.

भातशेतीचे पंचनामे करा

  • सतत पडणार्या पावसाने पिकलेले भातपीक आडवे झाले आहे. परतीच्या पावसाने भातशेती धोक्यात आली आहे.
  • भाताचे पीक कुजण्याची शक्यता आहे. पंचनामा करून भात पिकाची नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.
  • सर्व शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या कामात मग्न आहे. त्यामुळे त्यातून काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळ काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.

यंदा सुरूवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. दिवाळीपर्यंत सुगीचा हंगाम सुरू होईल, असा विश्वास होता. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला. काही शेतकर्यांचे भात अक्षरश: शेतात झोपले आहे. पीक कुजण्याचे तसेच भाताच्या दाण्यांना मोड येऊन भातपिकाचे नुकसान झाले असून शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाची आहे. - शशिकांत सरनाईक, शेतकरी, माळगाव, मालवण. 

माणगाव खोऱ्यात बहुतांश भातशेती कापणीसाठी सज्ज आहे. असे असताना पावसाने धिंगाणा घातला आहे. कापणीच्या हंगामास पावसामुळे विलंब झाला असून परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पूर्ण भातपीक पाण्यात आहे. त्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे. - गुरूनाथ पालकर, शेतकरी, माणगाव

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसfarmingशेती