शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे आंब्याच्या नशिबी यंदाही धोकाच?

By admin | Updated: October 23, 2014 22:48 IST

समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत असले तरी किमान तापमान २५ अंशांपर्यंत वाढले

कणकवली : राजकीय गरमागरमी सुरू असतानाच आॅक्टोबरचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच दिवाळीचं अभ्यंगस्नान करताना अंगावर काटा उभा करणारी थंडी अनुभवाला येण्याऐवजी पहाटे घामाच्या धारांचा अनुभव येत होता. मंगळवारी ३६ अंशापर्यंत पोहोचलेले तापमान गुरूवारी ३३ अंशावर आले असून, ते पुढील तीन दिवस वाढणार नाही, अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्येही तापमान ३0 अंशापेक्षा जास्तच राहील, असा अंदाज असल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया काहीशी उशिरा सुरू होण्याची भीती आहे. तसे झाले तर आंब्याला यंदाही नुकसानाच्याच वाटेवरून प्रवास करावा लागेल.आधी निवडणुका आणि मतमोजणीनंतर आता सत्ता स्थापनेवरून वणवा पेटला आहे. एका बाजूला ही राजकीय गरमागरमी असताना दुसऱ्या बाजूला आॅक्टोबरचा तडाखाही चांगलाच जाणवत आहे.समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ६४ टक्क्यांपर्यंत असले तरी किमान तापमान २५ अंशांपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच उष्मा अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. १६, १७ आणि २१ आॅक्टोबरला रत्नागिरीत ३६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. पावसाळ्यानंतरचे रत्नागिरीतील हे सर्वाधिक तापमान आहे. १८, १९ आणि २0 असे सलग तीन दिवस ३५ अंश इतके तापमान होते. मंगळवारी ३६ अंशांवर गेलेले तापमान बुधवारी तीन अंशांनी कमी झाले आहे. अर्थात किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यानच असल्याने उष्म्याची झळ चांगलीच जाणवू लागली आहे.येणारे तीन दिवस तापमान ३३ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज आहे. त्यानंतर ते २६ अंशांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. अर्थात परत नोव्हेंबरमध्ये ते ३0 अंशापेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आपल्या संकेतस्थळावर पुढील काही दिवसात उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.कोकणातील हापूस हे मुख्य फळपीक. गेली काही वर्षे बेभरवशी हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठी झळ सोसावी लागली आहे. आंब्याचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे मोहोराचा. थंडी जेवढी अधिक पडते, तेवढा मोहोर वाढतो. योग्य वेळेत थंडी कमी झाली तर मोहोराला फलधारणा होते आणि आंब्याची चांगली वाढ होते. ज्या-ज्या वर्षी किमान तापमान १७ ते १९ अंशांदरम्यान राहिले होते, त्या वर्षी हापूस चांगल्या प्रमाणात आला होता. मात्र, आताचे अंदाज पाहता नोव्हेंबरमध्येही कमाल तापमान ३0 अंशापेक्षा अधिक आणि किमान तापमान २१-२२ अंश इतके राहण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास थंडी लांबेल आणि मोहोर येण्याची वेळही पुढे जाईल, अशी भीती आहे. (प्रतिनिधी)उन्हाळा लांबला तर साहजिक आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन आंब्याचा हंगाम थोडा पुढे जातो, हा अनुभव याआधीही आला आहे. त्याचा प्रत्यक्ष पिकावर किती परिणाम होईल, हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.- हेमंत सावंत,कृषीतज्ज्ञ, कणकवली,