शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा प्रवेशासाठी डोनेशनचा घोडेबाजार सुरुच

By admin | Updated: May 16, 2014 00:40 IST

टेंभ्ये : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा संमत झाला आहे. राज्यामध्ये या कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तरीही डोनेशनचा घोडेबाजार

टेंभ्ये : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा संमत झाला आहे. राज्यामध्ये या कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तरीही डोनेशनचा घोडेबाजार खुलेआम सुरु असल्याचे चित्र राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु या वर्गाच्या प्रवेशासाठीच डोनेशन घेतले जात आहे. पालकांच्या सहकार्यामुळेच हा बाजार सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्याबाबत जागृती करुनदेखील पालकांमध्ये विशेष बदल झाल्याचे पाहायला मिळत नाही. केजी ते आठवीपर्यंतच्या वर्गांच्या प्रवेशासाठी पालकांकडून खुलेआम डोनेशन मागितले जाते. विशेष बाब म्हणजे शिक्षण विभाग व शासन स्तरावरुन शिक्षण हक्क कायद्याबाबत जागृती करुनदेखील पालकवर्ग बिनभोबाट डोनेशन भरत असल्याचे चित्र विशेषत: मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. डोनेशन मागणार्‍या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा आघाडीवर आहेत. केजीच्या वर्गासाठी जवळपास ३०,००० रुपयांपर्यंत डोनेशन मागितले जाते. तसेच या पुढच्या वर्गांसाठीदेखील या प्रमाणात डोनेशनची मागणी केली जाते. काही नामांकित मराठी माध्यमाच्या शाळांमध्येदेखील डोनेशनचा प्रकार चालत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये एका वर्गातून दुसर्‍या वर्गामध्ये गेल्यानंतरदेखील मदतीच्या स्वरुपात दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत डोनेशन घेतले जाते. शिक्षण हक्क कायद्यातील मोफत शिक्षणाच्या धोरणाबाबत शालेय शिक्षण विभाग व राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात जागृती केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागामध्ये प्रवेशाबाबत तक्रार नोंदविण्याची सुविधा असतानादेखील पालकवर्ग डोनेशनला बळी पडत आहे. इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण विनामूल्य स्वरुपात उपलब्ध करुन देणे. मुलाला त्याच्या राहत्या घराशेजारी इच्छेनुसार प्रवेश उपलब्ध करुन देणे, ही शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. यामुळे पालकांनी डोनेशनला बळी न पडता प्रवेशासाठी रितसर मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. (वार्ताहर)