शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूरचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:25 AM

मालवण : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे दहावी राज्यस्तरीय सागरी ...

मालवण : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने मालवण चिवला बीच येथे दहावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर) व हिमानी फडके (नागपूर) यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. स्पर्धेत मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत अपंग, मतिमंद तसेच बालवयोगटातील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करीत यशाला गवसणी घातली.सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित दहाव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी ७ वाजता झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी समुद्रात झेंडा दाखविताच पाच किलोमीटरचे स्पर्धक समुद्रात झेपावले. माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी राज्य जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब, उपाध्यक्ष बाबा परब, नील लब्दे, खजिनदार किशोर पालकर, धनंजय फडके, हृदय बागवे, डॉ. राहुल पंतवालावलकर, संदेश पारकर, हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाबी जोगी, परशुराम पाटकर, भाई कासवकर, सरोज परब, शिवाजी परब, अशोक सावंत, अशोक तोडणकर, संदेश चव्हाण, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, किसन मांजरेकर, आनंद मालंडकर, रुपेश प्रभू, संदेश कोयंडे उपस्थित होते.स्पर्धेत राज्यातील २९ जिल्ह्यांतून सुमारे ११०० स्पर्धक व त्यांचे पालक सहभागी झाले. रविवारी सकाळच्या सत्रात ३ किलोमीटर, २ किलोमीटर, १ किलोमीटर व ५०० मीटर अंतरासाठी जलतरण स्पर्धा पार पडली. दुपारच्या सत्रात स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा झाला. विविध १२ गटातील प्रथम येणाऱ्या जलतरणपटंूना प्रमाणपत्र, पदक, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांचा पदक, सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. दिव्यांग व गतिमंद मुलांच्या गटात सुमारे २०० दिव्यांगांनी सहभाग नोंदविला.स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीच्या जीवरक्षकांच्या टीमसह स्थानिकांची सुरक्षा पथके कार्यरत होती. पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जाणवली नाही. मात्र, स्पर्धेदरम्यान तीन स्पर्धक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यावेळी जीवरक्षकांनी त्यांना समुद्राबाहेर काढले. आयोजकांनी स्पर्धकांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.स्पर्धेचा निकाल : अहिका हेलगेकर, वेदांत मिसळे प्रथम५०० मीटर - वयोगट ६ ते ८ वर्षे - मुली प्रथम : अहिका हेलगेकर (बेळगाव), मुले प्रथम : वेदांत मिसळे (बेळगाव).१ किलोमीटर - वयोगट ९ ते १० वर्षे - मुली प्रथम : नियशी रुहिल (मुंबई उपनगर), मुले प्रथम : आदित्य घाग (ठाणे), गतिमंद - महिला प्रथम : जिया राय (मुंबई), पुरुष प्रथम : दक्ष फडके (नागपूर),२ किलोमीटर - वयोगट ११ ते १२ - मुली प्रथम : वैष्णवी अहिर (नाशिक), मुले प्रथम : नील वैद्य (रायगड), ५५ वर्षांवरील - महिला प्रथम : वर्षा कुलकर्णी (सांगली), पुरुष प्रथम : कलाप्पा पाटील (बेळगाव), दिव्यांग - महिला प्रथम : सिद्धी भांडारकर (नाशिक), पुरुष प्रथम : आदेश रुकडीकर (कोल्हापूर).३ किलोमीटर - वयोगट १३ ते १५ - मुली प्रथम : संजना जोशी (नागपूर), मुले प्रथम : आदित्य हिप्परगी (सोलापूर). वयोगट २६ ते ३५- महिला प्रथम : सोनाली वेंगुर्लेकर (बेळगाव), पुरुष प्रथम : सिद्धार्थ घाग (पुणे). वयोगट ४६ ते ५५ - महिला प्रथम : सुखजित कौर (मुंबई), पुरुष प्रथम : संजय जाधव (सांगली).५ किलोमीटर - वयोगट १६ ते १९ - मुली प्रथम : हिमानी फडके (नागपूर), मुले प्रथम : पृथ्वीराज डांगे (कोल्हापूर). वयोगट २० ते २५ - मुली प्रथम : सुबिया मुल्लानी, मुले : मयांक अग्रवाल (ठाणे), वयोगट ३६ ते ४५ - महिला प्रथम : उत्तरा पिठे (नाशिक), पुरुष प्रथम : संदीप भोईर (रायगड).