शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दोडामार्गातील वीज गायब

By admin | Updated: June 15, 2016 00:06 IST

‘महावितरण’चा कारभार : ग्रामस्थ आंदोलन करणार

साटेली भेडशी : पहिल्या पावसामुळे चिंब झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावे अंधाराच्या साम्राज्यात राहिली. वीज कर्मचाऱ्यांनी लाईनच्या दुरुस्तीकडे व साफसफाईकडे वेळेत पूर्णत: दुर्लक्ष केल्याने १५ दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात अनेक गावांत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. खंडित वीजपुरवठा, कामांबाबतचा पाठपुराव्याचा अभाव आणि कार्यक्षेत्र अंतर्गत गावातील मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुकावासीयांना अंधारात राहावे लागले. यामुळे याचा जाब विचारण्यासाठीच तालुकावासीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला; पण यामुळे मोठा वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा निर्माण झाला. यातच दोडामार्ग वीज कार्यालयातील शाखा अभियंता, कर्मचारी, वायरमन यांचे समन्वय नसल्याने कर्मचाऱ्यांचाही मनमानी कारभार सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील विद्युतवाहिन्यांवर आलेली झाडी, बांबू, झाडी-झुडपे तोडून विद्युतवाहिनी मोकळी करणे व तसे काम संबंधित कर्मचाऱ्यांकडून करून घेणे, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने थोडासाही पाऊस पडला तरी वीजपुरवठा खंडित अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शहरासह अनेक गावांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून विजेची गंभीर समस्या असून, दिवस-रात्री सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. फोनही बंद असल्याने वीज कंपनीच्या कारभाराबाबत संतापाची लाट उसळली आहे. विजेवर अवलंबून असलेल्या उद्योग व्यवसाय, नळपाणी योजना यांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यातच वाढीव बिलाच्या माध्यमातून व विविध उपकरांद्वारे सर्वसामान्य वीज ग्राहकांना लुबाडण्याचे काम दोडामार्ग महावितरणकडून सुरू असतानाही सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील विरोधी पक्षांचे नेते मंडळीही या प्रकाराकडे सोईस्कररीत्या डोळेझाक करत असल्याने लोकप्रतिनिधींबाबतही तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)