शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांना देशोधडीला लावणारी ‘जेटी’ नकोच

By admin | Updated: July 16, 2015 00:21 IST

गोकुळदास मोटे : प्रदूषणकारी प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न...

सावंतवाडी : तळवणे - आरोंदा खाडीकिनारी स्थानिक मच्छीमार पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने मासेमारी व खाडीतून उत्पन्न मिळवून मच्छीमार हक्कांचे व पारंपरिक संस्कृतीचे जतन करून आपले जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत प्रकल्पाला विरोध असतानासुद्धा शासन जबरदस्तीने प्रदूषणकारी प्रकल्प राबवून मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. याला आमचा विरोध असून, जेटी प्रकल्प शासनाने रद्द करावा, अशी मागणी मच्छीमार अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. भारत देशात शेतकऱ्यांसाठी कूळ वहिवाट कायदा लागू होतो, तर मग मच्छीमारांना का होऊ शकत नाही? भारतीय कूळ वहिवाट कायदा १८८२ नुसार मच्छीमारांना कायद्याने लागू आहे. ज्या खाडीक्षेत्रात मच्छिमार मासेमारी व्यवसाय करतात, ते संपूर्ण खाडीक्षेत्र कायद्याने मच्छीमारांच्या मालकी हक्काचे आहे. असे प्रकल्प खाडी क्षेत्रात आणण्यापूर्वी खाडी किनारी असलेल्या सर्व मच्छीमार बांधवांचे जनमत घेतले पाहिजे होते. परंतु ते घेतले नाही. याचा अर्थ असा की, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मच्छीमारांवर शासन खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप गोकुळदास मोटे यांनी केला आहे. पर्यटनाच्या बाबतीत सावरजुवे ते मानशीवाडीपर्यंत खाडी किनारा उंच, रुंद व भक्कम असा सिमेंट काँक्रिट पद्धतीची भिंत घालून बंधारा मजबूत करावा. याला आमचा विरोध नाही. बंधाऱ्यावर काही अडथळे असतील, ते दूर करावेत. खाडी पात्रात पर्यटनाच्या बाबतीत आमचा विरोध नाही. परंतु याबाबत पर्यटन महामंडळाने मच्छीमार बांधवांची स्वतंत्र बैठक घ्यावी, असे मोठे यांनी म्हटले आहे. राजन तेलींना वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांचे डोळे फोडणार, असे दानवेंनी वृत्तपत्रात म्हटले आहे. त्यानुसार आरोंदा जेटीच्या बाबतीत राजन तेली यांना वाकड्या नजरेने पाहणाऱ्या मच्छीमार लोकांचे डोळे दानवेंनी आरोंद्यात येऊन फोडावेत, नाही तर राजकारण सोडून भगवे कपडे घालून संन्यासाला बसावे, असे आक्रमक मत व्यक्त करत सत्तेच्या जोरावर उड्या मारू नयेत, असे मच्छीमार अध्यक्ष गोकुळदास मोटे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)