शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

अभियानाला सहकार्य करणाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 7:12 PM

kankavli BankingSector Sindhudurg : एआयबीईए या बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संघटनेला २० एप्रिल रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. संघटनेच्या ७६व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सध्या देशभरात वाहणारे खासगीकरणाचे वारे लक्षात घेता संघटनेतर्फे बँक खासगीकरणाविरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबँक कर्मचारी संघटनेचे मास्क, सॅनिटायझरचे वाटप खासगीकरणविरोधी पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती :

कणकवली : एआयबीईए या बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संघटनेला २० एप्रिल रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. संघटनेच्या ७६व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सध्या देशभरात वाहणारे खासगीकरणाचे वारे लक्षात घेता संघटनेतर्फे बँक खासगीकरणाविरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे. सरकारी बँकांमध्ये सामान्य जनतेच्या प्रचंड ठेवी आहेत, तर सर्वसामान्यांना कर्जपुरवठा याच बँकांमधून केला जातो. याबाबत जनजागृती करणारे एक पत्रक सावंतवाडी व कणकवली शहरात सुमारे ५००० नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.संबंधित पत्रक नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून कणकवली व सावंतवाडी शहरात अशा व्यक्तिंना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सर्वसामान्य खातेदारांबरोबरच समाजातील महनीय व्यक्तींशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधून आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून बँक खासगीकरण विरोधी मोहिमेला त्यांचा पाठिंबा मिळविला. तसेच निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांची संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली व त्यांच्याशी बँक खासगीकरण विरोधी मोहिमेची चर्चा केली. सरकारी बँका सार्वजनिक क्षेत्रातच असल्या पाहिजेत, या भूमिकेला पाठिंबा देत त्यांनी संघटनेतर्फे लोकसभेत सादर करावयाच्या निवेदनावर स्वत:ची स्वाक्षरी केली.जनआंदोलनाला सुरुवातकणकवली शहरात महाराष्ट्र बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या जनआंदोलनाला सुरुवात केली. यावेळी पत्रकार अशोक करंबेळकर यांना बँक खासगीकरण विरोधी अभियानाचे पत्रक देऊन त्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी उज्ज्वला धानजी, पूर्वा मराठे, रक्षिता गवाणकर व इतर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक सुशांत नाईक यांनी पाठिंबा देत संघटनेतर्फे लोकसभेला देण्यात येणाऱ्या निवेदनावर आपली स्वाक्षरी केल्याचेही संघटनेतर्फे म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली