"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:00 IST2025-06-19T10:44:43+5:302025-06-19T11:00:17+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन राणे बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
Nitesh Rane vs Nilesh Rane: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतींच्या नेत्यांमध्ये सध्या फूट पडल्याचं दिसत आहे. सत्ताधारी पक्षांचे नेतेच आक्रमक भूमिका घेत एकमेकांवर हल्ला करत आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंचे दोन्ही पुत्र आमने-सामने आले आहेत. भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार निलेश राणे यांच्यात पु्न्हा वादाची ठिणगी पडली आहे. यापूर्वी निलेश राणे यांनी नितेश राणेंना जपून बोलण्याच सल्ला दिला होता. त्यानंतर आता नितेश राणे यांनी
स्थानिक पातळीवरील राजकारणावरुन सोशल मीडियावर राणे बंधूंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राणे बंधूंमध्ये राजकारणातील बाप या विधानावरुन बिनसले होते. निलेश राणेंनी नितेश यांना जपून बोलण्याचा सल्ला एक्स पोस्टवरुन दिला होता. त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट केली. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीये. नितेश राणेंनी निलेश राणे यांच्या एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्याला धमकवणे बरोबर नसल्याचे म्हटलं. तसेच याची नोंद घ्याल अशी अपेक्षा आहे असेही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे काय म्हणाले?
"आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसाअगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकाऱ्याला धमकवणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो," असं नितेश राणे म्हणाले. यासोबत नितेश राणेंनी एका व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट निलेश राणेंना टॅग करत पोस्ट केला आहे. त्यामुळे आता दोन्ही भावांमध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
आदरणीय निलेशजी ,
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 18, 2025
आपणच काही दिवसा अगोधर महायुती बदल बोलला होता..
आता असे आपल्याच मित्र पक्षाचा पदाधिकारी ला धमकवणे बरोबर नाही..
शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत..
आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो @meNeeleshNRanepic.twitter.com/iMcMSTQVh3
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नितेशने जपून बोलावे असा सल्ला निलेश राणे यांनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर निलेश राणेंनी हा सल्ला दिला होता. निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. वडिल नारायण राणे हे भाजपचे खासदार, नितेश भाजपेच मंत्री तर निलेश हे शिवसेनेचे आमदार आहेत.